भाजपा जैन प्रकोष्ठ जिल्हा कार्यकारिणी घोषित; १० हजार सभासद नोंदणीचा संकल्प! आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते नोंदणी अभियानाचा शुभारंभ; मिरजेत भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात नूतन जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाभर व्यापक मोहीम राबवून तब्बल १० हजार नवीन सभासदांची नोंदणी करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा मेळावा उत्साहात पार पडला.
श्री. महावीर पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा
मेळाव्यात भाजपा जैन प्रकोष्ठाच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. महावीर पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यासोबतच जिल्हा उपाध्यक्ष, सचिव, संचालक व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश मामा ढंग आणि जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांनी या निवडींची घोषणा केली, तर श्री. प्रशांत गौंडाजे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांचे वाचन केले.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती आणि पक्षीय प्रोटोकॉल याविषयी सविस्तर माहिती दिली. सर्व नवनिवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. "भाजपा हा प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. जैन प्रकोष्ठाच्या माध्यमातून समाजात पक्षाचे कार्य अधिक जोमाने पोहोचेल."
आमदार सुधीरदादा गाडगीळ
आमदार गाडगीळ यांच्या हस्ते सभासद फॉर्मचे वितरण करून 'भाजपा जैन प्रकोष्ठ सभासद नोंदणी अभियानाचा' अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
'भाजपा जात-धर्म न मानणारा पक्ष' — प्रकाश मामा ढंग
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश मामा ढंग यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "भारतीय जनता पार्टी हा जात-धर्म न मानणारा आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे. जैन समाजातील जास्तीत जास्त नागरिकांना आणि तरुणांना भाजपच्या मुख्य प्रवाहाशी व विचारांशी जोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत."
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाद्वारे समाजाला प्रतिष्ठा — रावसाहेब पाटील
प्रदेश उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांनी पक्षाच्या धोरणांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "जैन समाजाचे संघटन आणि एकत्रीकरण करण्यासाठी या प्रकोष्ठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. भाजप सरकारने जैन समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी 'जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करून समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक स्तरावर १० हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू."
प्रमुख उपस्थिती आणि आभार
कार्यक्रमाचे स्वागत भाजपा जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री. प्रशांत गोंडाजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभव पाटील आणि श्री. श्रेयांश पाटील यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर:
सौ. स्वाती खाडे (जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा)श्री. विशाल पवार (भाजपा जिल्हा सरचिटणीस)श्री. राहुल नवलाई (भाजपा मध्य मंडल अध्यक्ष)श्री. समीर पुरिया शहा (सहसंघटक)श्री. शांतिनाथ कर्वे (शहर जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा)श्री. मनोज पाटील (मिरज पंचायत समिती सदस्य)श्री. अतुल शहा (भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष)श्री. प्रशांत पाटील मजलेकर (माजी उपमहापौर)श्री. शितल पाटील (माजी नगरसेवक)या मेळाव्याला जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.