Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! कोल्हापुरात वासनेचा थरार! नराधम प्रियकरानेच मित्रांच्या स्वाधीन केलं; अश्लील व्हिडीओ काढून कॉलेज तरुणीवर सामूहिक अत्याचार!

Big Breaking! कोल्हापुरात वासनेचा थरार! नराधम प्रियकरानेच मित्रांच्या स्वाधीन केलं; अश्लील व्हिडीओ काढून कॉलेज तरुणीवर सामूहिक अत्याचार!


राज्यभरात सातत्याने अनेक ठिकाणी महिला अत्याचार आणि हिंसेच्या घटना कानावर येत असताना कोल्हापूरमधून एक हादरवणारी बातमी समोर आली ओहे. कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांना लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी पिडीत तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक महिने शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर  जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राधानगरी येथील चार तरुणांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी एकजण पिडीत मुलीचा प्रियकर होता. सर्वात आधी आदित्य शेटके याने पिडीत तरुणीचे अश्लील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर त्याने पिडीत मुलीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. यानंतर या चारही जणांना मुलीवर अनेकदा बळजबरी करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. 

या चार संशयित आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती. काही काळानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आदित्याने पिडीत तरुणीशी शारीरिक जवळीक करुन तिचे व्हिडीओ चित्रित करुन तिचा गैरफायदा घेतला. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची चौकशी आणि अन्य तपास सुरु आहे. त्यामधून आता कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

खामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात 13 वर्षीय बालिकेवर चक्कीत दळण घेऊन आली असता एकाने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याच्या मित्रांनी बलात्कार करत असतानाचा व्हिडिओ काढला व तो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पीडीतेच्या तक्रारीवरून पोक्सो, ऍट्रॉसिटी सह माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलगा देखील आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.