Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​तेलाचा फेरवापर थांबवा, नाहीतर गाशा गुंडाळा! तुकाराम मुंढेंचा 'हा' ऐतिहासिक निर्णय वाचून खवय्यांनो सावधान!

​तेलाचा फेरवापर थांबवा, नाहीतर गाशा गुंडाळा! तुकाराम मुंढेंचा 'हा' ऐतिहासिक निर्णय वाचून खवय्यांनो सावधान!


अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सुरक्षित अन्न, स्वच्छ ठिकाणं आणि जबाबदार अन्न व्यवसाय यासंदर्भात FDA ने आदेश पारित केले आहेत. हॉटेल, रेस्तराँ, क्लाऊड किचन, ज्यूस बार यासह अन्न पुरवणाऱ्या सर्व ठिकाणांना नियमांचं पालन करावं लागणार आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. यावेळी वापरलेलं तेल पुन्हा वापरायचं नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

'तेल हे पुन्हा वापरायचे नाही'
"वापरलेले तेल हे पुन्हा वापरायचे नाही. जेव्हा तेलातून आग येते, वास येतो तेव्हा ते 25 टक्के खराब झालेलं असतं. हे तेल पूर्णपणे बाहेर काढलं जावं, ज्याच्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. पण त्याचा अन्न शिजवण्यासाठी पुन्हा वापर करता कामा नये. हे फार धोकादायक आहे," असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. FASSAI च्या Roko नियमचे पालन करावे लागणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

"आपण जे अन्न खातो ती तयार करण्याची प्रक्रिया, पॅकेजिंग यासंदर्भात नियम ठरले आहेत. 2011 पासून फूड सेफ्टीचे काही नियम आहेत. हॉटेल, रेस्तराँ, ऑनलाइन प्लॅटफॉर्म हे नियम पाळतात की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या कायद्यातर्गंत आम्ही मोहीम राबवत आहोत. आम्ही एक आदेश पारित केला आहे. जे नियम पाळायचे आहेत, जी प्रक्रिया आहे ती बंधनकारक असणार आहे. ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे," अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

अन्न पौष्टिक आणि सुरक्षित असावे

"सुरक्षित अन्न, स्वच्छ ठिकाणं आणि जबाबदार अन्न व्यवसाय यासंदर्भात आदेश पारित केले आहेत. जे नियम आहेत, त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. अन्न पौष्टिक असावे आणि सुरक्षित असावे ही जबाबदारी आमच्या विभागाची असते यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हॉटेल आणि उपहारगृह आहेत. ही आस्थापना कायदा पाळतात की नाही हे महत्वाचं आहे. परवाने अनिवार्य आहेत. त्याचं पालन झाले आहे. अन्न तयार करणे , पॅकेजिंग याचे नियम आहेत. अंमलबजावणी गरजेची आहे. कारवाई केली तेव्हा गंभीर त्रुटी आढळून आल्या साफसफाई नसते, तेलाचा सारखा वापर करणं, तापमान नियंत्रणातील त्रुटी, सुरक्षित पाणी नाही," अशी माहिती त्यांनी दिली.

मोफत आणि पिण्यायोग्य पाणी देणं अनिवार्य
"हॉटेल, उपहारगृह, कँटीन, कॅफेटेरिया ढाबे, क्लाऊड किचन, रेस्तराँ, मिठाईची दुकानं, ज्यूस बार, डार्क किचन, सेंट्रल किचन, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे जिथे अन्न तयार करुन पुरवलं जातं त्यांना हे नियम लागू होणार आहेत. त्यांच्याकडे परवाने असणे महत्वाचे असेल. स्वच्छता आणि आरोग्याचे नियम पाळणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे अन्यथा संसर्ग होऊ शकतो. गरम व थंड अन्नासाठी तापमान नियंत्रणात ठेवणं. ग्राहकांना मोफत आणि पिण्यायोग्य पाणी देणं अनिवार्य आहे. बाटली घेणं बंधनकारक नसेल. सबंधित बोर्ड लावले पाहिजेत. मेन्यूमध्ये सर्व माहिती देणे अनिवार्य आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.