🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: जुनी धामणी सांडपाणी योजनेच्या साहित्याची चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त​

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: जुनी धामणी सांडपाणी योजनेच्या साहित्याची चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त


सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी धामणी येथे शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामावरून साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​काय आहे नेमकी घटना?
जुनी धामणी (ता. मिरज) येथील संजीवनी फार्महाऊसच्या पाठीमागे शासकीय सांडपाणी व्यवस्थापन बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून पाणी उपसा करण्याची मोटार, दोन पांढऱ्या रंगाचे फोल्डिंग पाईप आणि लोखंडी सळ्यांचा बंडल असे साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी फिर्यादी प्रांजल संजय याठारकर (वय ३४, रा. मंत्री कॉलनी, उरुण ईश्वरपूर, ता. वाळवा) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून बी.एन.एस. कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अंकली फाट्याजवळ पोलिसांनी ठोकल्या मुसक्या

सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी या चोरीचा तातडीने तपास करून आरोपींना शोधण्याचे आदेश दिले होते.

​गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपासात असताना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, संशयित आरोपी सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली येथील सागर भवनजवळ चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी थांबले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अक्षय अनिल कोळी (वय ३०) आणि अनिल मारुती कोळी (वय ४३, दोघे रा. ग्रामपंचायतीजवळ, जुनी धामणी, ता. मिरज) यांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

​६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीची एचएफ डिलक्स मोटारसायकल, १० हजार रुपये किमतीचा बलवान कंपनीचा पाणी उपसा करण्याचा पंप, ४ हजार रुपये किमतीचे दोन फोल्डिंग पाईप आणि १ हजार रुपयांचा सळ्यांचा बंडल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना बी.एन.एस. ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रूपनर, अरुण औताडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजीत पाटील आणि पोलीस नाईक शेखर पवार यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अभिजीत पाटील करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.