🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"भाजप महिलांसोबत काय करतं, हे तुला लवकरच कळेल!" काँग्रेस खासदाराचा कंगना रनौतवर घणाघाती हल्ला!

"भाजप महिलांसोबत काय करतं, हे तुला लवकरच कळेल!" काँग्रेस खासदाराचा कंगना रनौतवर घणाघाती हल्ला!


बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपची लोकसभा खासदार कंगना रनौत यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'  च्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. तिनं हिंदू तरुणींवर गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश करणाऱ्या, ड्रग्ज-दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या असं म्हणत टीका केली. अनेक अपमानास्पद, वादग्रस्त भाषा वापरत कंगनानं जेन-झी आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केली. अशातच आता कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकेची धनी झाली आहे.

कंगनावर चोहीकडून टीका होत असतानाच, आता काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना रेणुका चौधरी यांनी कंगना रनौतवर टीकास्त्र डागलं. काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रेणुका चौधरी यांनी कंगना रनौतच्या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली. केवळ गटारातून आलेले लोकच ओळखू शकतात की, आणखी कोण गटारातून आले आहे आणि कोण नाही..., असं म्हणत रेणुका चौधरी यांनी कंगनाला सुनावलं आहे.

काँग्रेस खासदार रेणुका चौधरी कंगनावर टीका करताना काय म्हणाल्या? 
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या की, "मी विचारते, 'गृहिणी' असण्यासाठी तिच्याकडे कोणते प्रमाणपत्र किंवा पात्रता आहे? ती एक उत्तम गृहिणी होऊ शकते, असे कोणी सांगितले? केवळ गटारातून आलेले लोकच ओळखू शकतात की आणखी कोण गटारातून आले आहे आणि कोण नाही."
आम्ही तुझ्याकडूनच शिकतोय... : खासदार रेणुका चौधरी 

खासदार रेणुका चौधरी पुढे म्हणाल्या की, "ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, एक महिला या विचारानं अशा प्रकारे लिहितेय की, तिची प्रशंसा होईल आणि सरकार संसदेत तिला पाठिंबा देईल... भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतो, हे तिला लवकरच कळेल. जर तुम्ही संसदेत अशा प्रकारची चर्चा करत असाल, तर आणखी काय अपेक्षा करता येईल? शेवटी, आम्ही तुम्हाला पाहूनच शिकतोय. याचे परिणाम भोगावे लागतील..."

कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य काय?
कंगना रनौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हिंदू तरुणींबद्दल अत्यंत अपमानास्पद टिप्पणी केलेली. अभिनेत्री कंगना रनौतनं लिहिलेलं की, स्वतंत्र करिअर करणाऱ्यांचं अनुकरण करणं हे तरुण हिंदू महिलांसाठी लज्जास्पद आहे. तिनं नमूद केलं की, स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिला स्वतःची जबाबदारी स्वतः पेलतात आणि त्यासाठी पालकांच्या पैशांवर अवलंबून राहत नाहीत, याउलट, काही महिला पालकांच्या पैशांवर जगतात, अंमली पदार्थ, मद्यपान करतात आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवतात. कंगना रनौतनं अशा महिलांना गटार-क्लास, कुरूप आणि भ्रष्ट असं म्हटलेलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.