रक्तबंबाळ आंदोलक, पोलिसांची दडपशाही! लाठीचार्जच्या व्हिडिओवर सरन्यायाधीशांचं धक्कादायक विधान - "बघायला रस नाही!"
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील संसद मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या लाठीचार्जचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून अनेकांनी पोलिसांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतची एक तातडीची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका सुनावणीला आली होती. याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी सुनावणीदरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जचे व्हिडिओ पाहून याची दखल घेण्याची विनंती सरन्यायाधीशांकडे केली होती. पण सरन्यायाधीशांनी व्हिडिओ पाहायला आपल्याकडे वेळ नाही, असे म्हटले.
याचिकाकर्त्या वकिलांनी कोर्टात पोलिसांकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराची माहिती दिली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. तुम्हीच हे व्हिडिओ पाहावेत आणि याची समोटो दखल घ्यावी, अशी विनंती वकिलांनी केली होती.
वकील आपले म्हणणे मांडत असतानाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांना मधेच थांबविले आणि म्हटले की, व्हिडिओ पाहण्यात आम्हाला रस नाही, कारण तेवढा वेळ आमच्याकडे नाही. तुम्ही कोर्टाचा आणि स्वत:चाही वेळ वाया घालवू नका, असेही कोर्टाने वकिलांना सुनावले. कोर्टाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे सुरूवात सरन्यायाधीश यांच्या एका विधानामुळेच झाली होती. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपहासात्मकपणे सीजेपीची सुरूवात केली होती. पण त्याला सोशल मीडियात अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याला आंदोलनाचे स्वरुप आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.