🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचे प्रसिद्ध नवमांश कुंडली अभ्यासक किशनलाल पुरोहित (शेठ) यांचे निधन; ज्योतिष विश्वात मोठी पोकळी

सांगलीचे प्रसिद्ध नवमांश कुंडली अभ्यासक किशनलाल पुरोहित (शेठ) यांचे निधन; ज्योतिष विश्वात मोठी पोकळी


सांगली: ज्योतिष क्षेत्रातील दिग्गज आणि नवमांश कुंडलीचे गाढे अभ्यासक श्री. किशनलाल शंकरलाल पुरोहित यांचे आज अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि दूरदूरपर्यंत त्यांचा मोठा चाहता व अभ्यासक वर्ग होता. सांगलीत ते 'शेठ' या टोपणनावाने सर्वांचे अत्यंत लाडके आणि परिचित होते. त्यांच्या निधनाने सांगलीच्या सांस्कृतिक आणि ज्योतिष विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

​गाढे अभ्यास आणि अफाट ख्याती
​किशनलाल पुरोहित यांना ज्योतिष शास्त्रातील 'नवमांश कुंडली' या क्लिष्ट विषयाचा प्रचंड सखोल अभ्यास होता. अचूक मार्गदर्शन आणि साधी राहणी यामुळे त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. केवळ सांगलीच नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यांतून आणि राज्यांतूनही लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत.
असा आहे परिवार

​त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून आणि 3 नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सांगलीतील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराचे मुख्य पुजारी श्री. हेमंत पुजारी यांचे वडील होत. ​किशनलाल पुरोहित (शेठ) यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगली शहर व परिसरात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

​सांगली दर्पण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
"नवमांश कुंडलीचे गाढे अभ्यासक श्री. किशनलाल पुरोहित (शेठ) यांना सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि पुरोहित परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.