Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत क्रूरतेची सीमा पार! असहाय्य आजीला आधी लुटलं, नंतर जिवंत जाळलं; नराधमांच्या कृत्याने संताप

सांगलीत क्रूरतेची सीमा पार! असहाय्य आजीला आधी लुटलं, नंतर जिवंत जाळलं; नराधमांच्या कृत्याने संताप

सांगली: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत अमानुष आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील शेटफळे गावामध्ये अज्ञात चोरांनी एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावरील दागिने लुटले आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जिवंत पेटवून दिले.

या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या वृद्ध आजीचा सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मालन मारुती जाधव असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी आजींचे नाव आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधम आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी मृत मालन यांचे पुत्र विठ्ठल मारुती जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पहाटेच्या सुमारास दबा धरून बसला होता काळ!

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालन जाधव या शेटफळे गावात घरात एकट्याच राहत होत्या. ३० जून रोजी पहाटेच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी उठून घराबाहेर गेल्या होत्या. त्या बाहेरून परत घरात येत असतानाच, अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या मागोमाग घरात प्रवेश केला.

दागिने लुटले अन् पुरावा नष्ट करण्यासाठी पेटवले


चोरट्याने घरात घुसताच मालन आजींवर हल्ला केला आणि त्यांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. आजींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, किंवा आपली ओळख पटेल या भीतीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने क्रूर चोरानं आजींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना थेट जिवंत पेटवून दिले आणि तो पसार झाला.
उपचारादरम्यान आजींची प्राणज्योत मालवली


आगीच्या विळख्यात सापडलेल्या आजींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. गंभीररीत्या भाजलेल्या मालन जाधव यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.