🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला लाच स्विकारताना अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला लाच स्विकारताना अटक


नाशिक : नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिटको चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद हिरामण शेजवळ (वय ५५) आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश मुकुंद कुमावत (वय ३८) यांना ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या दाजी यांनी जंगलात झाडास गळफास घेऊन जीवन संपविल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद असून चौकशी सुरू होती. या प्रकरणात तक्रारदारावर जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपींनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. 

तक्रारीची १८ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपींनी पहिल्या हप्त्यापोटी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. दोघांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार योगेश साबळे व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळवे यांनी पथकात सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेरळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.