सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि राजेश नाईक फाउंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने फलटणजवळ पंढरपूर वारीकडे जाणाऱ्या वारकरी भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी हजारो वारकरी भाविकांना लाडू, केळी व इतर फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. पालखी मार्गावरील या सेवाभावी उपक्रमाचा वारकरी मंडळींनी मोठ्या आनंदाने लाभ घेतला व आयोजकांचे आभार मानले.
या उपक्रमाचे आयोजन सांगली शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्री. राजेशदादा नाईक यांनी केले होते. ते स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांची सेवा करत होते. राजेश नाईक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला. यावेळी बोलताना श्री. राजेशदादा नाईक यांनी, यंदा वारकऱ्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी आर एन ग्रुपचे व शहर जिल्हा काँग्रेसचे
"संदीप आपटे, उदय नाईक, मोहन गायकवाड, शामराव शिंदे, नंदकुमार मुळीक, अशोक मुळीक, नंदकुमार कारंडे, दिलीप पाटील, राजू सूर्यवंशी, व्यंकटेश नाईक, विवेक नाईक, रोहित गुंजी, अमित मुळीक, संयम केसरे, विश्वास यादव, नामदेव पठाडे, सुनील साळुंखे, राकेश सुखासने इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.