Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इतिहास घडला! कोर्टाचा थेट 'टोल प्लाझा'वर जप्तीचा हातोडा; वाशीम न्यायालयाच्या आदेशाने खळबळ!

इतिहास घडला! कोर्टाचा थेट 'टोल प्लाझा'वर जप्तीचा हातोडा; वाशीम न्यायालयाच्या आदेशाने खळबळ!


वाशीम जिल्हा न्यायालयाचा टोल प्लाझा जप्त करण्याचा अभूतपूर्व आदेश

शेतकऱ्याला देय असलेला जमीन मोबदला न दिल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने कठोर भूमिका घेत टोल प्लाझा बंद करण्याचा अभूतपूर्व आदेश दिल्याची माहिती पक्षकराचे वकील अँड.उदय देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.न्यायालयाने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

न्यायालयाच्या आदेशामुळे संबंधित टोल प्रशासनास मोठा धक्का बसला असून, या निर्णयाची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कीं, राष्ट्रीय महामार्ग क. १६१ मध्ये बेबिताई दिनकर गर्जे व त्यांचा मुलगा विठ्ठल दिनकर गर्जे यांची मौजे जांभरूण नावजी येथील राज्य महामार्ग ५१ वाशिम ते रिसोड लगत असलेले गट नं. ५५, ५६, ५७ जो की रहिवाशी कारणासाठी अकृषक करण्यात आला होता. त्यामधून वाशिम वळण नवीन रस्ता करण्याकरिता जमीन अधिग्रहीत केली होती. तत्कालीन भू-संपादन तथा उप विभागीय अधिकारी यांनी फक्त अधिकृत केलेल्या प्लॉटचाच मोबदला दिला. हे अधिग्रहण करतांना ले आउट मधील रस्ते, खुला प्लॉट व सुखसोयीसाठी सोडलेल्या खुली जागांचा भाग अधिग्रहण केली होती. परंतु त्याची नुकसान भरपाई दिलेली नाही. तसेच अधिग्रहण केलेल्या जमीनीचा भाव हा राज्य महामार्गाला लागून असल्यामुळे शासकीय रेडी रेकनरच्या चारपट ठरवावा लागतो. तर त्यांनी जांभरूण नावजी गावठाणांचा भाव जे की राज्य महामार्गापासून ५०० मीटर आतमध्ये आहे. त्या भावाप्रमाणे कमी नुकसान भरपाई वाशीम कोर्ट ऑर्डर्स दिली. यावर व्यथित होउन बेबिताई व विठ्ठल यांनी लवाद अप्पर जिल्हाधिकारी, वाशिम यांचेकडे याचिका दाखल केली व अप्पर जिल्हाधिकारी यांनी राज्य महामार्गाला लागून ले-आउट असल्याकारणाने वाढीव भाव केला व तसेच अधिग्रहीत केलेल्या रस्ते, खुली जागा व सुखसोयीच्या जागेला या नव्या भावाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच जेही प्लॉट अधिग्रहीत केले होते व त्यांना कमी भाव दिला होता तेही राज्य महामार्गावरील दराप्रमाणे वाढवून दिले.

राष्टीय महामार्ग वाशीम कोर्ट ऑर्डर्स प्राधिकरण यांनी ही रक्कम आदेशित केल्याप्रमाणे दिली नाही. म्हणून बेबिताई व विठ्ठल यांनी जिल्हा न्यायालय वाशिम येथे वसुलीसाठी ६ दरखास्ती दाखल केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची जबाबदारी असुनही न्यायालयीन आदेशाप्रमाणे. त्यांनी रक्कम भरली नाही. वाशिम जिल्हयाच्या अधिकारक्षेत्रामध्ये फक्त तोंडगाव धुमका टोल प्लाझा जो की, तोंडगाव येथील गट नं. ३०२ मध्ये आहे व जेथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रोजचे २ ते ३ लाखापेक्षा जास्त रक्कम चारचाकी वाहन धारकांकडून वसूली करते. तो जप्त करण्याची मागणी केल. ही मागणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांनी मान्य केली व दि. ०७/०७/२०२६ रोजी तोंडगाव - धूमका टोल प्लाझा जप्त करण्याच्या वॉरंटवर सहया केल्या. आजपर्यंत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वसूल होण्यासाठी न्यायालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा टोल नाका जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यापेक्षा नामुष्की याआधी कधीही झाल्याचे पाहण्यात आलेले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.