धक्कादायक! सोनम वांगचुकांच्या सहकाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचा खळबळजनक खुलासा


दिल्लीतील जंतर मंतर येथे आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या २० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आले असून त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलन स्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठा दावा करत दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
“दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथून सोनम वांगचुक सरांना ताब्यात घेतलं विद्यार्थ्यांवर देखील लाठीचार्ज केला. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो. तिथे मला पोलिसांना मारहाण करत थांबवून ठेवलं होतं.” असा गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. सोनम सरांना ताब्यात घेतल्यानंतर मला पोलिसांनी सोडून दिलं आहे. जंतर मंतर मध्ये मला जाऊन देत नाहीये. असा दावा दिपके यांनी केला आहे.
दिपकेंचं आवाहन

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देशभरात शांततापूर्ण आंदोलन सोनम सरांच्या समर्थनार्थ आपल्याला करावं लागणार, असे आवाहन दिपके यांनी केलं आहे. मात्र, अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर केलेल्या आरोपांवर आता दिल्ली पोलिसांकडून याबाबत काय सांगितले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी बळजबरीने सोनम सरांना ताब्यात घेतलं असून विद्यार्थ्यांसोबत झालेला लाठीचार्ज आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देखील अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

व्हिडिओ शेअर करत ‘चलो संसद’चा नारा
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील जंतर मंतर येथे मागच्या २० दिवसांपासून सोनम वांगचुक हे आंदोलनाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा २१ वा दिवस होता. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलस्थळी मोठा गोंधळ उडाला. वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री २० जुलै रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वांगचुक यांनी 'चलो संसद'च्या आंदोलनाचा नारा दिला होता. या आंदोनलात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.