🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साऊथ सुपरस्टार राम चरण हॉस्पिटलमध्ये दाखल! अमेरिकेतून बोलावले डॉक्टर, अभिनेत्यावर गंभीर सर्जरी

साऊथ सुपरस्टार राम चरण हॉस्पिटलमध्ये दाखल! अमेरिकेतून बोलावले डॉक्टर, अभिनेत्यावर गंभीर सर्जरी


मुंबई: ग्लोबल स्टार राम चरणच्या जगभरातील करोडो चाहत्यांची धडधड वाढवणारी एक बातमी नुकतीच समोर आली होती. या साऊथ सुपरस्टारला दुखापत झाल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा चाहते चिंतेत पडले. कोयंबटूरला जाण्यासाठी राम चरण आपल्या कुटुंबासोबत विमानतळावर दिसल्याने ही चिंता आणखीच वाढली होती. मात्र, आता त्याच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि खूशखबर समोर आली आहे. राम चरणवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून तो आता बरा होत आहे.

'पेड्डी'च्या सेटवर घडला अपघात
आपल्या 'पेड्डी' या बिग बजेट चित्रपटाच्या सेटवर एक हाय-व्होल्टेज ॲक्शन सीन शूट करताना राम चरणच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही दुखापत दुर्लक्ष केल्याने आणि शूटिंग सुरू ठेवल्यामुळे अधिकच बळावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्याला तातडीने सर्जरी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला कोयंबटूर येथील प्रसिद्ध गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अमेरिकेतून बोलावले तज्ञ

दुखापत अत्यंत गुंतागुंतीची असल्याने देश-विदेशातील निष्णात डॉक्टरांची विशेष टीम तैनात करण्यात आली होती. गंगा हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एस. राजशेखरन आणि डॉ. प्रवीण भारद्वाज यांच्यासोबतच अमेरिका येथून विशेष निमंत्रित केलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हँड अँड रिस्ट सर्जन डॉ. अलेजांद्रो बादिया यांनी एकत्र येत ही लॅपरोस्कोपिक सर्जरी अत्यंत अचूकतेने यशस्वी केली.

कुटुंबाची साथ अन् चाहत्यांचे प्रेम
या कठीण प्रसंगात मेगास्टार चिरंजीवी, आई सुरेखा आणि पत्नी उपासना हे सगळेच राम चरणसोबत रुग्णालयात उपस्थित होते. डॉक्टरांच्या मते, आता राम चरणची प्रकृती स्थिर असून कॅमेऱ्यासमोर परतण्यापूर्वी त्याला काही काळ फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन प्रोग्राममधून जावे लागणार आहे. राम चरणच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे कळताच जगभरातील चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.