Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"रामललाच्या दरोड्यावर उद्धव ठाकरे कडाडले; '...आता हिंदू गप्प बसणार नाही!', भगव्या आंदोलनाचा थरारक मेगाप्लॅन तयार!"

​"रामललाच्या दरोड्यावर उद्धव ठाकरे कडाडले; '...आता हिंदू गप्प बसणार नाही!', भगव्या आंदोलनाचा थरारक मेगाप्लॅन तयार!"


मुंबई: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या दान घोटाळ्या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राम मंदिरातील दान चोरीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या रविवारी, ५ जुलै रोजी दादरमध्ये रामरक्षा आंदोलन होणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. दादर मधील आंदोलनात उद्धव ठाकरे हे स्वत: सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडले. उद्धव यांनी म्हटले की, "राम जन्मभूमी आंदोलनाचे भांडवल करून भाजपने अमर्याद सत्ता भोगली. पण आज त्याच राम मंदिरात चोरी झाली आहे. मंदिरात दान म्हणून आलेला पैसा हाच पैसा आता पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय अशी चर्चा सुरू आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अब हिंदू मार नही खायेगा, असे म्हटले होते. आता राम मंदिरातील दान चोरांना 'हिंदू माफ करणार नाही' असा थेट आणि घणाघाती हल्ला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनातील शिवसेनेच्या योगदानाचा उल्लेख करत म्हणाले, "संपूर्ण देश आज एकाधिकारशाहीखाली (भाजपच्या अंमलाखाली) आहे. राम मंदिरासाठी आणि त्या आंदोलनात शिवसेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, भाजपने या आंदोलनाचा वापर केवळ सत्तेच्या वाटचालीसाठी केला. आज राम मंदिराचा मुद्दा एका वेगळ्या आणि चुकीच्या कारणाने चर्चिला जात आहे, हे देशाचे दुर्दैव आहे."

'ऑपरेशन राम मंदिर' म्हणायचं का?

राम मंदिराच्या कारभारावर आणि तिथल्या कथित गैरव्यवहारावर बोट ठेवत ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. "हे आता 'ऑपरेशन राम मंदिर' आहे का असा सवाल त्यांनी केला. राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, अशी उघड चर्चा आता जनतेत सुरू आहे. मंदिर लुटणाऱ्या या चोरांना हिंदू आता कदापि माफ करणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

'रामरक्षा आंदोलन', मेगा प्लॅन तयार...
अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीच्या विरोधात आणि भाजपच्या राजकारणाविरोधात उद्धव ठाकरे यांनी थेट रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. येत्या रविवारपासून दादर येथील कबुतरखान्याजवळील हनुमान मंदिरासमोर सर्व हिंदूंनी राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

"मी स्वतः रविवारी दादरमध्ये उपस्थित राहून 'रामरक्षा आंदोलन' करणार आहे. जे जे बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत आणि जे स्वतःला खरे हिंदू समजतात, त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हे आंदोलन केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून, शहरापासून ते अगदी खेड्यापाड्यापर्यंत आम्ही राम मंदिरातील चोरीच्या विरोधात आंदोलन पेटवणार आहोत," असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्व रामभक्तांना केले आहे. राम रक्षा आंदोलनात सगळ्या हिंदूंना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये राजकीय पक्षाचे नेते ते सरकारमधील प्रमुख, मंत्री यांनाही हे आवाहन असल्याचे उद्धव यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.