गरम दुधासोबत गूळ खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहितीयेत का? अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय!
१. दुधासोबत गुळाचा मेळ, वजनावर बसेल ताबा!
रोजच्या दुधात साखरेऐवजी गूळ वापरल्यास लठ्ठपणा झपाट्याने नियंत्रणात येतो. गुळामधील पोषक घटक अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात.
२. शरीरातील अशुद्ध रक्त होणार साफ
गुळामध्ये नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात. गरम दुधासोबत याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि तुम्ही आजारांपासून दूर राहता.
३. पोटाचे विकार आणि सांधेदुखीपासून सुटका
जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल, तर गरम दूध आणि गूळ उत्तम उपाय आहे. तसेच, यामुळे सांधेदुखीलाही आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र खाल्ल्यास हाडे आणि सांधे मजबूत होतात.
४. मासिक पाळीच्या त्रासावर गुणकारी
महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरते. पाळी येण्याच्या एक आठवडा आधीपासून रोज १ चमचा गूळ खाल्ल्यास थकवा आणि पोटदुखी कमी होते.
५. त्वचा होईल चमकदार आणि केस होतील मजबूत
दुधातील कॅल्शियम, प्रोटीन आणि गुळातील लोहामुळे (Iron) त्वचेला नैसर्गिक निखार येतो, त्वचा मुलायम होते आणि केसांचे आरोग्यही सुधारते.
६. मिनिटांत थकवा होईल गायब!
कामाच्या ताणामुळे प्रचंड थकवा जाणवत असल्यास गरम दुधासोबत ३ चमचे गूळ खा. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा क्षणात दूर होतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.