Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"सुखाच्या शोधात देश सोडला, पण नशिबाने घात केला; अमेरिकेत लॅव्हिश लाईफ जगणाऱ्या भारतीय कुटुंबाचा रात्रीत करुण अंत, मदतीसाठीही कुणी पुढे आलं नाही!"

​"सुखाच्या शोधात देश सोडला, पण नशिबाने घात केला; अमेरिकेत लॅव्हिश लाईफ जगणाऱ्या भारतीय कुटुंबाचा रात्रीत करुण अंत, मदतीसाठीही कुणी पुढे आलं नाही!"


अमेरिकेतून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील वॉर्सेस्टर शहरात एका भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांमध्ये आई वडिलांसह एका २० वर्षीय मुलीचा समावेश आहे. 
हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत शिफ्ट झालं होतं. चांगली नोकरी, उत्तम राहणीमान आणि डॉलरमध्ये कमाई, यामुळे हे कुटुंब चांगलं आयुष्य जगत होतं. मात्र रविवारी रात्री घडलेल्या एका घटनेमुळे हे संपूर्ण कुटुंब संपलं आहे. त्यांच्या मदतीला देखील कुणी येऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील वॉर्सेस्टर शहरात असलेल्या 'इकोनो लॉज मोटेल'ला लागलेल्या भीषण आगीत भारतीय वंशाच्या एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळचं गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील रहिवासी होते. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतकांची ओळख आणि पार्श्वभूमी
या आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून, यामध्ये हितेशभाई सुथार, त्यांची पत्नी हिनाबेन सुथार आणि त्यांची २० वर्षांची मुलगी ईशानी सुथार यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुथार कुटुंब सुमारे दोन वर्षांपूर्वी आपल्या चांगल्या भविष्याच्या शोधात अमेरिकेत गेलं होतं आणि तिथेच स्थायिक झालं होतं. हितेशभाई हे ज्या 'इकोनो लॉज मोटेल'ला आग लागली, तिथेच काम करायचे आणि त्यांचे कुटुंब देखील याच मोटेलच्या आवारात राहत होतं.
बाथरूममध्ये लपले, पण काळाने गाठलेच!

ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री उशिरा दीडच्या सुमारास घडली. सर्वजण गाढ झोपेत असताना मोटेलमध्ये अचानक आग लागली. बघता बघता काही क्षणात ही आग वेगाने पसरू लागली, ज्यामुळे सुथार कुटुंब आपल्या खोलीतच अडकले. बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याचे पाहून त्यांनी तत्काळ मदतीसाठी मोटेलच्या फ्रंट डेस्कवर फोन केला.

फ्रंट डेस्कवरून मिळालेला तो एक सल्ला ठरला जीवघेणा...
Front Desk कडून सुथार कुटुंबाला असा सल्ला देण्यात आला की, खोलीतील धूर आणि आगीपासून वाचण्यासाठी त्यांनी तात्काळ खोलीच्या बाथरूममध्ये जावे, पाण्याचे नळ चालू ठेवावेत आणि तिथेच सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबाने या सूचनेचे पालन केले आणि स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. ते तिथेच बचाव पथकाची वाट पाहत राहिले.
मदत मिळण्यास उशीर आणि गुदमरला श्वास

दुर्दैवाने, आग इतकी भीषण होती की तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात आणि मदत कार्य सुरू करण्यात अग्निशामक दलाला बराच वेळ लागला. या विलंबादरम्यान, खोलीत आणि बाथरूममध्ये प्रचंड धूर पसरला. अखेर धुरामुळे दम घुटल्याने हितेशभाई, हिनाबेन आणि त्यांची तरुण मुलगी ईशानी या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

नडियादमध्ये शोककळा, मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू
या वेदनादायक घटनेची माहिती मूळगावी पोहोचताच सुथार कुटुंबाच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे. सध्या अमेरिकन प्रशासन या हॉटेलला आग लागण्याच्या कारणांचा कसून तपास करत आहे. दुसरीकडे, मृत तिन्ही सदस्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक दूतावासाच्या संपर्कात आहेत. एका हसत्या-खेळत्या भारतीय कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.