🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! उपमुख्यमंत्र्यांची बैठक आटोपली अन् थेट ४५ लाखांची लाच स्वीकारली; मोठा अधिकारी जाळ्यात!

धक्कादायक! उपमुख्यमंत्र्यांची बैठक आटोपली अन् थेट ४५ लाखांची लाच स्वीकारली; मोठा अधिकारी जाळ्यात!

बीड : शासकीय अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरी काही केल्या कमी होत नाही. बीडमधून लाचखोर अधिकाऱ्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री, तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची बैठक संपवून घरी जाताच तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.


राहत्या घरीच या लाचखोर अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. या घटनेमुळे बीडच्या अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार दौऱ्यावर होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार घरी गेले. त्यावेळी राहत्या घरी ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे त्यांच्या निवासस्थानी परतले. याच ठिकाणी त्यांनी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचाराविरोधात मोठा संदेश गेल्याची चर्चा आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

एकूण रक्कम : 45 लाख

5 लाख : खऱ्या नोटा

40 लाख : डमी (मनोरंजन बँक) नोटा

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड यांनी सन 2025-26 मधील वृक्षलागवडीची बिले मंजूर करून देणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे तसंच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तक्रारदाराने 29 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने शुक्रवारी सापळा रचत कारवाई केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजनाची बैठक संपवून कार्यालयात गेले आणि कार्यालयातून घरी बोलावून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. सायंकाळच्या सुमारास श्रीनिवास लखमवाड यांनी 45 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतलं. या रकमेत पाच लाख रुपये खऱ्या नोटांच्या स्वरूपात तर उर्वरित रक्कम मनोरंजन बँकेच्या (डमी) नोटांच्या स्वरूपात होती.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.