Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

५५ कोटींचं २४ कॅरेट सोनं अन् अंगावर फाटकी चादर! सांगलीच्या अक्षयचा गुवाहाटीत भयंकर कारनामा; पोलीसही चक्रावले!

५५ कोटींचं २४ कॅरेट सोनं अन् अंगावर फाटकी चादर! सांगलीच्या अक्षयचा गुवाहाटीत भयंकर कारनामा; पोलीसही चक्रावले!


सांगली: चोर चोरी करण्यासाठी काय काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. सांगलीतला एक तरूण गुवाहाटीला गेला, तिथे भिकारीच्या वेशात फिरत होता. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्याची झाडाझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे तब्बल ३७ किलो म्हणजेच ५५ कोटींचं सोनं आढळलं. 
हे पाहून पोलीसही अवाक् झाले, या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील गुवाहाटी इथं पोलिसांनी सांगलीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाकडून तब्बल ३७ किलो सोनं जप्त केलं आहे. हे सगळं सोनं २४ कॅरेट पक्कं सोनं होतं. या पोराचं नाव अक्षय बनसोडे असं आहे. तो सोमवारी गुवाहाटीमधील खारघुरी गावात फिरत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.
भिकारी बनून फिरत होता अक्षय

अक्षय बनसोडे हा इतकं मोठं सोनं घेऊन फिरत होता, आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून त्याने भिकारी बनून तो फिरत होता. अंगावर त्याने मोठी चादर ओढली होती, त्यामध्ये त्याने सोनं लपवलं होतं. अंगावर वरतून चादर आणि आतमध्ये त्याने खिसे बनवले होते, यामध्ये त्याने सोनं लपवलं होतं. अक्षय हा कुरिअर बॉय म्हणून काम करत होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो सोनं घेऊन जाण्याचं काम करत होता. मागील काही महिन्यांमध्ये त्याने २० किलो सोन्याची तस्करी केली होती, अशी माहिती पोलीस उपआयुक्त सांभवी मिश्रा यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचं कनेक्शन
पोलिसांनी याा प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा यामागे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला. हे रॅकेट मीडिल इस्ट आणि म्यानमारमध्ये तस्करी करतं, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू शहराशी या गँगचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. हे रॅकेट कसं काम करतं, सोनं कुठून आणि कुठे घेऊन जातं याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी अक्षय बनसोडेला ताब्यात घेतलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.