Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रम्प यांचा अहंकार चक्काचूर! जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत कोर्टाचा सर्वात मोठा दणका

ट्रम्प यांचा अहंकार चक्काचूर! जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत कोर्टाचा सर्वात मोठा दणका


अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना आज मोठा झटका दिला. जन्मतः नागरिकत्वाच्या अधिकारावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा वटहुकूम न्यायालयाने रद्द ठरवला. खंडपीठाने सहा विरुद्ध तीन मतांनी हा निकाल दिला. त्यामुळे अमेरिकेत जन्मताच तेथील नागरिकत्व मिळण्याचा अधिकार यापुढेही अबाधित राहणार आहे. अमेरिकी राज्यघटनेतील 14 व्या घटनादुरुस्तीनुसार त्या देशात जन्मणाऱया प्रत्येक व्यक्तीला आपोआपच अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. 'अमेरिका फर्स्ट' ही घोषणा करत दुसऱयांदा सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांनी कायद्यातील ही तरतूद बदलण्याचे प्रयत्न सुरू केले होते. तसा आदेशही काढला होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.