🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभयनगरमधील घरफोडी अन् इचलकरंजीतून दुचाकी चोरी; सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ लाख ५० हजारांचा ऐवज हस्तगत

अभयनगरमधील घरफोडी अन् इचलकरंजीतून दुचाकी चोरी; सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ लाख ५० हजारांचा ऐवज हस्तगत


सांगली :- घरफोडी आणि मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह दोन बालअपचाऱ्यांना जेरबंद करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले आहे. संजयनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उघडकीस आलेल्या या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​मंगळवार बाजारात रचला सापळा
जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी एलसीबीला विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना, अमराई परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मेघनाथ ऊर्फ मेध्या सोनभाईर हा दोन बालअपचाऱ्यांसह संजयनगरमधील मंगळवार बाजार येथील पालिका गाळ्यांजवळ चोरीचे दागिने विकण्यासाठी आला असल्याची पक्की बातमी अंमलदार संकेत कानडे, संदीप पाटील व अभिजीत माळकर यांना मिळाली. ​बातमीच्या आधारे पथकाने मंगळवार बाजारात सापळा रचून तिघांना संशयितरीत्या थांबलेले असताना जागीच ताब्यात घेतले.
अंगझडतीत सोन्या-चांदीचे दागिने अन् चोरीची गाडी उघड

ताब्यात घेतलेल्या संशयितांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम सोन्याचे दागिने (पेन्डन, टॉप्स, मणी), १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने (छल्ला, पैंजण) आणि ६० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लिंडर मोटार सायकल (एकूण ३,५०,००० रुपये) मिळून आली.

​दागिन्यांबाबत आणि गाडीबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दोन महिन्यांपूर्वी अभयनगर (संजयनगर ठाणे हद्द) येथील एक बंद घर फोडल्याची आणि इचलकरंजी येथील एका अपार्टमेंटच्या समोरून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

​गुन्ह्यांची उकल आणि आरोपी वर्ग
तपासात संजयनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. २३०/२०२६) व इचलकरंजी पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा गुन्हा (गु.र.नं. २१४/२०२६) उघडकीस आला आहे. याशिवाय मुख्य आरोपी मेघनाथ सोनभाईर हा संजयनगर पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात (गु.र.नं. १४७/२०२६) फरार होता आणि त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे नोंद आहेत.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संदीप पाटील, संकेत कानडे, अभिजीत माळकर, अतुल माने, अनिल कोळेकर, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, ऋषिकेश सदामते, विनायक सनदी, विक्रम खोत, विजय पाटणकर, अजय पाटील, करण परदेशी, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवाडे व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. जप्त मुद्द्यामालासह आरोपींना पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.