Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वे प्रवाशांचे हाल! १० ते १७ जुलै दरम्यान 'या' महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द; पाहा संपूर्ण यादी

रेल्वे प्रवाशांचे हाल! १० ते १७ जुलै दरम्यान 'या' महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द; पाहा संपूर्ण यादी


लोणावळा- कर्जत रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे मागील चार दिवसांपासून रेल्वे विस्कळीत झाली असून, या मार्गावरील तीनही मार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे दि. १० ते १७ जुलै दरम्यान महत्त्वाच्या एक्सप्रेसह अन्य रेल्वे गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्यामध्ये डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, हुबळी-दादर, दौंड-इंदूर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-चैन्नई अशा एकूण १४ गाड्या पुढील आठ दिवसांसाठी रद्द केल्या आहेत.

मुंबई-कोल्हापूर-मुंबई (दि. १० ते १७), हडपसर-जोधपूर-हडपसर (११ ते १७), सातारा-दादर एक्सप्रेस (११, १३ आणि १४) तर दादर-सातारा एक्सप्रेस (१०, १२, १३ आणि १७), दादर-शिर्डी एक्सप्रेस (११, १४, १५ आणि १६) तर शिर्डी-दादर एक्सप्रेस (१०, १२, १५ आणि १६) रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष गाड्या मुंबई-गोरखपूर (१० ते १५ पर्यंत),

गोरखपूर – मुंबई (१२ ते १७ पर्यंत), पुणे-गोरखपूर एक्सप्रेस (१० ते १५ पर्यंत), गोरखपूर-हडपसर एक्सप्रेस (११ ते १६ पर्यंत), पुणे-गाझीपूर सिटी एक्सप्रेस (१० आणि १४ रोजी), गाझीपूर सिटी-हडपसर एक्सप्रेस (१२ आणि १६ रोजी), पुणे-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस दि. १० तर हजरत निजामुद्दीन-पुणे एक्सप्रेस दि. ११ रोजी रद्द करण्यात आली आहे.

रात्रंदिवस प्रयत्नशील- रेल्वेमंत्री
पुणे-मुंबई घाट सेक्शनमधील दरडी कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानीचा व पुनरुत्थान कामाचा आढावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला. एका मार्गाची दुरुस्ती पूर्ण केली असून, सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील सर्व गाड्या आता दोन लोकोमोटिव्ह (इंजिन) वापरून चालवण्यात येत आहेत. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत, असे वैष्णव यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.