शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत हे सध्यावेगळ्याकारणांसाठीसध्याअडचणीतआलेआहे. सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत सह पती आणि कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राऊत कुटुंबीयांकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर आता 23 जुलैला सुनावणी होणार असून 23 जुलैपर्यंत विनायक राऊत, गितेश राऊत यांची चौकशी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तरदुसरीकडे माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढणायतआल्याचीमाहितीआहे. विनायक राऊत यांनी पत्रव्यवहार केला, पण मागणी अमान्य करत संरक्षण पुन्हा देण्यास नकार माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरदुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत यांचे पोलीस संरक्षण काढण्यात आले आहे. संरक्षण शाखा-1 कडून पत्राद्वारे संरक्षण मागे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 30 मे रोजी सुरक्षा काढण्याबाबत अधिकृत पत्र पाठवण्यात आले होते. मात्र संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती करत विनायक राऊत यांनी पुन्हा पत्रव्यवहार केला होता. अशातच, संरक्षण शाखा-1 ने त्यांची मागणी अमान्य करत संरक्षण पुन्हा देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संरक्षण काढण्यातआल्याने या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कापूरबावडी पोलिसांची दोन पथकं कोकणात दाखल
अशातच विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोप प्रकरणानंतर कापूरबावडी पोलिसांची दोन पथकं कोकणात दाखलझाल्याचीमाहितीआहे. या प्रकरणात एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला असून एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. तर इतर तीन ठिकाणी ज्या ठिकाणी पिडीत महिलेला जादूटोण्यासाठी नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी पोलीस आता जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या ठिकाणीही आपल्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा आरोप पिडीतेने तक्रारीत केला होता. त्यानंतर आता पोलीस यंत्रणात्या दिशेने तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.