देशभरात सध्या इथेनलॉ मिश्रित पेट्रोलविषयी चर्चा सुरू आहेत. सरकार म्हणते की, इथेन लॉ मिश्रित पेट्रोल टाकल्याने गाडी खराब होत नाही आणि मायलेजवरही कोणताच परिणाम होत नाही. पण आता उत्तराखंडातील प्रसिद्ध यूट्यूबर सौरव जोशीने या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सौरव जोशीने काय दावा केलाय?
सौरव जोशीने आपल्या एका व्हिडिओ ब्लॉकमध्ये दावा केलाय की, त्याची मर्सिडीज-बेंज SUV चं मायलेज अचानक खुप कमी झालं आहे. सौरवने व्हिडिओमध्ये कारच्या डॅशोर्डवर दिसणारे आकडेही शेअर केले आहेत. ज्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर इथेनॉल पेट्रोलविषयी नवा वाद सुरू झाला आहे. तसंच या प्रकरणावर मर्सिडीज-बेंज इंडिया आणि सरकारकडून आपली बाजूही मांडण्यात आली आहे.
मर्सिडीजमध्ये टाकलं इथेनॉल पेट्रोल, 17 वरुन 5km/l वर आलं मायलेज
उत्तराखंडाचे हल्द्वानी येथील राहणाऱ्या यूट्यूबर सौरव जोशीने आपल्या व्लॉग Race With Brothers. Kon Jeetega मध्ये सांगितलं की, त्याची मर्सिडीज-बेंज एसयूव्हीचं मायलेज अचानक वेगाने कमी झालं. त्यांनी सांगितल्यानुसार पहिले कार जवळपास 15 ते 17 किलोमीटर मायलेज देत होती. जे नंतर 9 km/l पर्यंत पोहोचलं आणि पुढच्या दिवशी डॅशबोर्डवर फक्त 5 km/l मायलेज दिसू लागतं. त्यांनी दावा केला की, हा बदल इथेनॉल-मिश्रित पेट्रोल भरल्यानंतर झालं आहे.
रेंजही 800 किलोमीटरने कमी होऊन 480 किलोमीटर झाली आहे. व्हिडिओमध्ये सौरव जोशीची पत्नी अवंतिका भट्टनेही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, आधी कारची टँक फूल केल्यावर जवळपास 800 किलोमीटरपर्यंत रेंज दिसत होती. पण आता रेंज कमी होऊन 480 किलोमीटर राहिली आहे. ते म्हणतात की, एवढी महागडी कार असुनही अशा प्रकारचा बदल चिंता वाढवणारा आहे. त्यांना भिती आहे की, पेट्रोल इंजिनमध्ये काही तांत्रिक अडचण येऊ नये.
यूट्यूबर सौरव जोशीने उपस्थित केले प्रश्न
सौरव जोशीने व्हिडिओमध्ये सांगितलं की, त्याच्याजवळ मर्सिडीजची एक इलेक्ट्रिक G-Wagon ही आहे. यामुळे त्यात इथोनॉल पेट्रोलसारखी चिंता नसते. पण पेट्रोलच्या कारविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, हल्द्वानी सारख्या लहान शहरात जर मर्सिडीज सारख्या प्रीमियम कारमध्ये काही तांत्रिक खराबी आली तर ती ठिक करण्यासाठी दिल्लीत पाठवावी लागते. यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीही वाढतो.
नर्सिडीज-बेंज इंडियाचे CEO ने काय म्हटलंय?
मायलेज आणि इथेनॉल पेट्रोलविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मर्सिडीज-बेंज इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO संतोष अय्यर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अनेक ग्राहक या मुद्द्याविषयी डीलरशिपकडून माहिती घते आहेत. पण ते म्हणतात की, 2020 वर्षानंतर कंपनी अंतर्गत विकल्या जाणाऱ्या सर्व गाड्या E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी अनुकूल बनवल्या आहेत. त्यांनी असंही म्हटलंय की, ही समस्या इथेनॉलची नाही. तर कुठे इंधनात अवैध भेसळ होते त्याची ही समस्या आहे. याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सरकारने काय म्हटलंय?
देशात प्रदुषण कमी करणे आणि कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने सरकार E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या दाव्यांना - जसे की इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान होते किंवा गंज चढतो - केवळ एक चुकीचा प्रचार आहे असं म्हणत फेटाळून लावलंय. ते म्हणाले की, आतापर्यंत E20 पेट्रोलमुळे गाड्या बंद पडल्याची किंवा बिघाड झाल्याची कोणतीही अधिकृतपणे सिद्ध झालेली घटना समोर आलेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.