🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तरुणांसाठी सुवर्णसंधी! कॉटन कॉर्पोरेशनमध्ये मेगा भरती; तब्बल १.२० लाख पगाराची नोकरी मिळवा, त्वरित अर्ज करा!

तरुणांसाठी सुवर्णसंधी! कॉटन कॉर्पोरेशनमध्ये मेगा भरती; तब्बल १.२० लाख पगाराची नोकरी मिळवा, त्वरित अर्ज करा!


भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाची उपकंपनी असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (CCI) विविध पदांवरील 148 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 9 जुलै 2026 ते 24 जुलै 2026 या कालावधीत cotcorp.org.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. पदवीधर, बी.कॉम, बी.एस्सी. ॲग्रीकल्चर, एमबीए, सीए आणि सीएमए यांसारखी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

कोणत्या पदासाठी किती जागा?

सहाय्यक व्यवस्थापक (शासकीय भाषा) - 1
सहाय्यक व्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) - 1
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) - 8
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखांकन) - 8
कनिष्ठ वाणिज्यिक कार्यकारी - 50
कनिष्ठ सहाय्यक (लेखांकन) - 50
कनिष्ठ सहाय्यक (सर्वसाधारण) - 30
एकूण - 148

कॉटन कॉर्पोरेशन भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईट cotcorp.org.in ला भेट द्या.
होमपेजवरील CCI भरती 2026 या लिंकवर क्लिक करा.
नवीन अकाऊंट तयार करण्यासाठी नोंदणी करा आणि लॉगिन तपशील मिळवा.
लॉगिन केल्यानंतर, अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
तुमचा फोटो, सही आणि प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
अर्ज शुल्क ऑनलाईन भरा आणि अर्ज सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट नक्की घ्या.
पगार किती असेल?

पगार पदानुसार बदलतो. असिस्टंट मॅनेजर पदासाठी निवड झालेल्यांना ₹40,000 ते ₹1,40,000 पर्यंत पगार मिळेल. मॅनेजमेंट ट्रेनींना ₹30,000 ते ₹1,20,000 पर्यंत वेतनश्रेणी मिळेल. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर असिस्टंट पदांसाठी पगार ₹22,000 ते ₹90,000 पर्यंत आहे. याचा अर्थ असा की, काही पदांसाठी पगार ₹१ लाखापेक्षा जास्त असू शकतो, ज्यामुळे ही भरती आणखी आकर्षक बनते.

या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी. या भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी Cotton Corporation Recruitment 2026 advertisement notification pdf या लिंकवर क्लिक करा.

निवड प्रक्रिया कशी पार पडेल?
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल. प्रथम, संगणक आधारित चाचणी (CBT) घेतली जाईल, ज्यामध्ये चुकीच्या उत्तरांसाठी 0.25 गुणांचे नकारात्मक गुण असतील यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि शेवटी, वैद्यकीय तपासणीद्वारे अंतिम निवड निश्चित केली जाईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.