🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूबाजांनो सावधान... तुम्ही पिताय ती 'नकली' व्हिस्की? उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; बनावट दारूचा अख्खा ट्रकच जप्त!

दारूबाजांनो सावधान... तुम्ही पिताय ती 'नकली' व्हिस्की? उत्पादन शुल्क विभागाचा मोठा दणका; बनावट दारूचा अख्खा ट्रकच जप्त!


तुम्हीसुध्दा व्हिस्कीचे शौकीन आहात का?. कारण तुम्ही पित असलेली व्हिस्की बनावट असू शकते. कारण सध्या राज्यात वनावट व्हिस्कीचे ट्रकच्या ट्रक नेत असल्याचं उघड झालंय. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये समोर आलाय.

गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने साळमुख चौकात सापळा रचला होता. यावेळी सांगोला मार्गे धुळेकडे जाणारा एक संशयित ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रकसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही दारू नेमकी कुठून आणण्यात आली होती आणि ती कुठे पोहोचवली जाणार होती, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येतोय. खरंतर, गेल्याच महिन्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारु प्रकरणामुळे 18 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे बनावट दारूविरोधात राज्यभर धडक मोहिमा राबवत कठोर कारवाईची गरज आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.