राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठे फेरबदल; विश्वजित देशमुख सांगलीचे तर प्रदीप पोटे जळगावचे नवे अधीक्षक, १० अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील 'गट-अ' आणि 'गट-ब' संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. राज्यपाल यांच्या आदेशानुसार गृह विभागाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
अधीक्षक (गट-अ) बदल्यांची नवीन नियुक्ती:
विश्वजित देशमुख: बीड ते सांगलीप्रदिप पोटे: सांगली ते जळगावनितीन घुले: मुंबई उपनगर-१ ते अहिल्यानगर-१रविकिरण कोले: रायगड ते पुणे-२प्रमोद सोनोने: अहिल्यानगर-१ ते यवतमाळकेशव राऊत: लातूर ते नंदुरबारश्रीम. स्नेहा सराफ: नंदुरबार ते मुंबई उपनगर-१नितेश शेंडे: यवतमाळ ते बीडउप अधीक्षक (गट-ब) बदल्यांची नवीन नियुक्ती:संतोष बी. जगदाळे: उप अधीक्षक-१, पुणे-१ ते रायगडमनोज बी. चव्हाण: उप अधीक्षक-१, मुंबई उपनगर-२ ते मुंबई शहरकडक इशारा: बदलीच्या ठिकाणी तातडीने रुजू न झाल्यास तो कालावधी 'अकार्यदिन' (No Work, No Pay) म्हणून गणला जाईल. तसेच, बदली रद्द करण्यासाठी राजकीय किंवा इतर कोणताही दबाव आणल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नुसार कडक शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.