Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा; रिमोटवर बदलली जाते वाहनाची नंबरप्लेट

गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा; रिमोटवर बदलली जाते वाहनाची नंबरप्लेट

गुटख्याची अवैध वाहतूक करण्यासाठी गुटखा तस्करांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर करीत गुटखा वाहतुकीसाठी वापरण येणाऱ्या वाहनांची दोन्ही नंबर प्लेटसमोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसविला.रिमोट कळ दाबताच काही क्षणांत नंबर प्लेट पूर्णपणे झाकून पोलिसांची दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून , नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडीच्या आहेर वस्ती ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा वाहन अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली.त्यावेळी ही बाब समोर आली.

मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी ४ लाख ९२ हजार २०० रुपये प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूसह १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला. हेमंत प्रभाकर पवार यास अटक केली. तर सराईत गुटखा तस्कर कुणाल संजय मेने फरार झाला आहे.मेने यांच्याविरोधात पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुटखा तस्करीचे गुन्हे दाखल झाले आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.