🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकशाहीचा खून की सत्तेची लाचारी? "२०-२५ हजार मतं कट करून मला आमदार करा", भाजप नेत्याच्या विधानाने वादळ!

लोकशाहीचा खून की सत्तेची लाचारी? "२०-२५ हजार मतं कट करून मला आमदार करा", भाजप नेत्याच्या विधानाने वादळ!


केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनर्पडताळणी म्हणजेच SIR मोहिमेवरून सुरूवातीपासूनच अनेक वादविवाद निर्माण झाले आहेत. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या प्रक्रियेत आयोगाकडून अनेक मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा आरोप केला आहे. सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू असतानाच भाजप नेत्याच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. पंजाबमधील भाजपच्या नेत्या रेणू कश्यप यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्या भाजपच्या प्रदेश सचिव आहेत. SIR मध्ये मतं डिलिट करून मला आमदार बनविण्याचे विधान त्यांनी केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमपिंगप लिंह राजा वडिंग यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करत टीका केली आहे.

काय म्हणाल्या कश्यप?
वडिंग यांनी म्हटले आहे की, रेणू कश्यप यांचे भाजपच्या फायद्यासाठी एसआयआरच्या माध्यमातून २० ते २५ हजार मतदारांची नावे काढून टाकण्याचे हे कथित विधान खूप गंभीर असून निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्चचिन्ह निर्माण करणारे आहे. भाजपनेही कितीही प्रयत्न केले तरी एकही योग्य नाव वगळू देणार नाही. मतदान करण्याचा प्रत्येक पात्र मतदाराला अधिकार असून आम्ही त्यांच्या हक्काचे संरक्षण करू.  निवडणूक आयोगाने त्वरीत या विधानाची दखल करून चौकशी करायला हवी. निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष आणि भेदभावरहित व्हावी, हे आयोगाने सुनिश्चित करायला हवे, असे वडिंग यांनी म्हटले आहे.

दीनानगर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अरूणा चौधरी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी अनिंदिता मित्रा यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. व्हिडिओची सत्यता पडताळून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. टीका होऊ लागल्यानंतर भाजपकडून खुलासा करण्यात आला आहे. विरोधकांची कश्यप यांच्या विधानाची मोडतोड करून ते व्हायरल केल्याचा आरोप भाजपने केला आहे. कश्यप यांचे विधान सार्वजनिक व्यासपीठावर केलेले नाही. ते पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच्या खासगी बैठकीतील आहे. मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती करण्याचा या बैठकीचा उद्देश होता. खरे मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.