🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक विधान! "श्रीकृष्ण धर्माने मुस्लीम होते..."; मौलाना अन्सारींच्या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट, कायदेशीर कारवाईची मागणी!

धक्कादायक विधान! "श्रीकृष्ण धर्माने मुस्लीम होते..."; मौलाना अन्सारींच्या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट, कायदेशीर कारवाईची मागणी!


श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच, आता एका जुन्या विधानाने सोशल मीडियावर पुन्हा एकदा नवा वाद पेटवला. वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मौलाना अन्सारी यांनी थेट श्रीकृष्ण बाबत अजब दावा केला. "भगवान श्रीकृष्ण हे धर्माने मुस्लिम होते आणि ते दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे," असा अजब दावा मौलाना अन्सारी यांनी केला. या विधानाचा झाल्यानंतर हिंदू संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या असून, मौलानाला तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.


श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकाचा विपर्यास

भाषणात मौलाना अन्सारी यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ देत स्वतःचा दावा खरा असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गीतेतील अध्याय ६ मधील १० व्या श्लोकाचा (योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः...) उल्लेख केला. मौलाना यांनी दावा केला की, "या श्लोकात भक्तांना पूर्ण शरीराने प्रार्थना करण्याचा (नमाजसारखा) निर्देश दिला आहे. जर हिंदूंनी त्यांचे ग्रंथ नीट वाचले, तर त्यांना इस्लाम हाच वैश्विक धर्म असल्याचे पटेल. भगवान राम आणि कृष्णाशी संबंधित ग्रंथांमध्येही हेच लिहिले आहे." मौलाना जर्जिस यांनी आपल्या दाव्यासाठी गीतेच्या श्लोकाचा पूर्णपणे चुकीचा आणि सोयीस्कर अर्थ लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.

श्लोकाचा वास्तविक अर्थ
"एका योग्याचे कर्तव्य आहे की त्याने आपले मन, शरीर आणि आत्मा निरंतर परमेश्वराच्या चरणी लीन करावे. एकांतात राहून, आपल्या मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवून, सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा आणि मोहापासून मुक्त व्हावे." या श्लोकात कुठेही 'नमाज' किंवा 'इस्लाम' या शब्दांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. केवळ ध्यान आणि योगाद्वारे ईश्वरप्राप्तीचे मार्गदर्शन यात केले आहे.
हिंदू संघटनांकडून अटकेची मागणी

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या संवेदनशील वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने मथुरेत तणावाचे वातावरण आहे. हिंदू संघटनांनी मौलाना जर्जिस अन्सारी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. हिंदू आराध्य दैवतांचा अपमान करणाऱ्या मौलानाला तात्काळ बेड्या ठोकल्या पाहिजेत अशी मागणी हिंदू संघटना आणि नेत्यांनी केली आहे. ऐतिहासिक तथ्यांची आणि धार्मिक ग्रंथांची मोडतोड करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचा आरोप संघटनांनी केला.

मौलानाचा 'तो' महिलांविषयीचा वादग्रस्त इतिहास
मौलाना जर्जिस अन्सारी वाद निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२२ मध्ये त्यांनी महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि क्रूर विधान केले होते. "मुस्लिम महिलेने कोणत्याही परिस्थितीत पतीची लैंगिक इच्छा पूर्ण केली पाहिजे, मग ती प्रसूती कळ सहन करत असली तरीही तिने नकार देऊ नये," असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर संपूर्ण देशभरातून आणि खुद्द मुस्लिम समाजातील पुरोगामी घटकांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता. आता श्रीकृष्णाबाबत केलेल्या विधानामुळे मौलाना पुन्हा एकदा अडचणीत येणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.