🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांनो सावधान! सांगली पोलिसांची धडक कारवाई सुरू

अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांनो सावधान! सांगली पोलिसांची धडक कारवाई सुरू


सांगली शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सांगली वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणाऱ्या पालकांवर आणि वाहन मालकांवर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
​दिनांक १३ आणि १४ जुलै २०२६ रोजी राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी अथवा चारचाकी वाहने सोपवल्याचे स्पष्ट झालेल्या ०५ पालक आणि वाहन मालकांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
​अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसाचें पाऊल

​वाहतूक नियंत्रण शाखा, सांगलीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सर्व पालक आणि वाहन मालकांना कडक शब्दांत आवाहन केले आहे. १८ वर्षांखालील मुलांच्या हाती कोणत्याही परिस्थितीत वाहन देणे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा कायदेशीर गुन्हा आहे. अल्पवयीन मुलांच्या अपरिपक्व वाहन चालवण्यामुळे त्यांच्या स्वतःच्या तसेच रस्त्यावरील इतर निष्पाप नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

कारवाई आणखी तीव्र होणार!
​सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, आगामी काळातही ही विशेष तपासणी मोहीम अशीच सातत्याने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालक किंवा वाहन मालकांवर यापुढेही कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.