पंजाबमध्ये भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगरूर जिल्ह्यातील भाजपच्या मुख्य कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक 'पेट्रोल बॉम्ब' फेकून हल्ला केल्याने खळबळ उडाली.
आगीनंतर कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंगही फवारण्यात आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मध्यरात्री झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कार्यालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले जात असून शहरात मोठी नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.संगरूरचे एसपी-डी दविंदर अत्री यांनी सांगितले की, त्यांनी डीएसपी आणि संगरूर एसएचओ यांच्यासह भाजप कार्यालयात पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली. अत्रींच्या म्हणण्यानुसार, बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरण्यात आले होते, ज्याचा वापर नंतर पेट्रोल बॉम्ब बनवण्यासाठी करण्यात आला. घटनेच्या तपासाचा भाग म्हणून पोलीस सीसीटीव्ही पाळत ठेवत आहेत . पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील दोषींविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अत्री यांनी सांगितले. "आम्ही दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करत आहोत आणि त्यांच्यावर कारवाई करू... दोषींना लवकरच अटक केली जाईल..." असे ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.