🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महावितरणच्या रत्नागिरी सिव्हिल विभागाचा अत्यंत भोंगळ कारभार; दापोली उपविभाग कार्यालयाची दुरवस्था, कामकाज ठप्प!

महावितरणच्या रत्नागिरी सिव्हिल विभागाचा अत्यंत भोंगळ कारभार; दापोली उपविभाग कार्यालयाची दुरवस्था, कामकाज ठप्प!


वादळी पावसात पत्र्याचे शेड उडाले; शासकीय रेकॉर्ड अन् संगणक धोक्यात, महिला कर्मचाऱ्यांची शौचालयाअभावी होतेय कोंडी


​दापोली / रत्नागिरी: महावितरणच्या रत्नागिरी सिव्हिल (स्थापत्य) विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि अनास्थेमुळे खेड विभागाअंतर्गत येणाऱ्या दापोली उपविभाग कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दापोली कार्यालयावरील पत्र्याची शेड उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सध्या संपूर्ण कार्यालयात पाणी गळती होत असून, शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

​महत्त्वाची कागदपत्रे आणि उपकरणे धोक्यात
​कार्यालयात पाणी साचल्यामुळे महावितरणची महागडी संगणकीय उपकरणे, प्रिंटर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुने शासकीय रेकॉर्ड भिजून खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कार्यालयात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने काम कसे करायचे, असा संतप्त सवाल कर्मचारी विचारत आहेत. या गोंधळामुळे महावितरणच्या ग्राहक सेवेवर अत्यंत विपरीत परिणाम झाला आहे.
​स्थापत्य विभागाला गांभीर्य कधी येणार?

​एकीकडे कार्यालयाची ही दुरवस्था झाली असताना, दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यालयातील महिला शौचालय गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. यासंदर्भात वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही.

​ग्राहकांचा आणि कर्मचाऱ्यांचा वाढता असंतोष
एका बाजूला वीज ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे दावे केले जातात, तर दुसरीकडे खुद्द कर्मचाऱ्यांनाच जीव मुठीत धरून आणि सोयीसुविधांअभावी काम करावे लागत आहे. नादुरुस्त शौचालय आणि आता कार्यालयातील पाणी गळतीमुळे कर्मचारी आणि नागरिक दोघांचेही प्रचंड हाल होत आहेत. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून कार्यालयाची डागडुजी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.