Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फायदा की नुकसान? एअर फ्रायरमध्ये अन्न शिजवण्यामागचं खरं सत्य आलं समोर!

फायदा की नुकसान? एअर फ्रायरमध्ये अन्न शिजवण्यामागचं खरं सत्य आलं समोर!


आजकाल एअर फ्रायरला खूप मागणी आहे. ते स्वयंपाकाचे एक अतिशय सामान्य साधन बनत चालले आहे. खरं तर, आरोग्यदायी स्वयंपाकासाठी एअर फ्रायर हा सर्वोत्तम पर्याय म्हणून त्याचा प्रचार केला जात आहे. असे म्हटले जाते की, त्यात शिजवलेले अन्न अत्यंत आरोग्यदायी असते. टीव्ही असो वा सोशल मीडिया, सर्व माध्यमांवर एअर फ्रायरचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, एअर फ्रायर खरोखरच स्वयंपाकासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे?

एअर फ्रायर कसे काम करते?
एअर फ्रायरमध्ये गरम हवेच्या प्रवाहाद्वारे अन्न शिजवले जाते. त्यामध्ये अगदी कमी किंवा अजिबात तेल न वापरता अन्न शिजवता येते. गॅसवर जे पदार्थ किंवा जेवण बनवण्यासाठी खूप तेल लागते, ते पदार्थ एअर फ्रायरमध्ये तेलाशिवाय शिजवता येतात. अन्न जास्त वेगाने फिरते आणि कमी वेळात शिजते. एअर फ्रायरमध्ये शिजवलेल्या अन्नाची चव तळलेल्या पदार्थांसारखीच लागते. त्यामुळे ज्यांना तळलेले पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करणे हा एक चांगला पर्याय आहे.
एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यदायी असते का?

एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न आरोग्यदायी मानले जाते. कारण- त्यात जास्त तेल वापरले जात नाही. एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न कमी तेलात सहज शिजते आणि चवीलाही चांगले लागते. खरे तर, डीप फ्रायिंगमध्ये खूप तेल वापरले जाते. त्यामुळे कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण वाढते. डीप फ्राय केलेल्या पदार्थांमध्ये भरपूर अस्वास्थ्यकर चरबी असते . याउलट, एअर फ्रायरमध्ये शिजवलेल्या अन्नामध्ये खूप कमी कॅलरीज आणि कमी चरबी असते. एअर फ्रायरमध्ये शिजवल्यामुळे तेलाचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांनी कमी होते.

एअर फ्रायरमध्ये शिजवलेल्या अन्नाचे फायदे
एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा टाळण्यास मदत होऊ शकते.
एअर फ्रायरमधील अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा टाळता येईल.
एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने मधुमेह, तसेच उच्च कोलेस्ट्रॉलमुळे आजारांना प्रतिबंध होतो.
एअर फ्रायरमध्ये बनवलेले अन्न खाल्ल्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो.
त्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.
एअर फ्रायर पूर्णपणे सुरक्षित आहे का?

एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न पूर्णपणे सुरक्षित असते, असे मानणे ही एक चूक आहे. एअर फ्रायरमध्ये वारंवार प्रक्रिया केलेले पदार्थ, गोठवलेले पदार्थ किंवा स्नॅक्स खाणे हानिकारक ठरू शकते. त्याशिवाय, एअर फ्रायरमध्ये अन्न खूप उच्च तापमानावर शिजवले जाते, ज्यामुळे पिष्टमय पदार्थांमधून ॲक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर पडते, जे तुमच्या आरोग्याला संभाव्यतः हानी पोहोचवू शकते.

एअर फ्रायरमध्ये बनवलेले अन्न पचनसंस्थेसाठी चांगले असते का?
एअर फ्रायरमध्ये कमी तेलात अन्न शिजवले जाते, ज्यामुळे ते पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते. एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने गॅस, अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या समस्या टाळता येतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.