कोयनानगर :- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला असून, धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज, बुधवार दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, धरणात तब्बल ७३,०३८ क्यूसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे गेल्या २४ तासांत धरणात ६.३१ टीएमसी नवीन पाण्याची भर पडली आहे.
पाणीपातळी आणि सद्यस्थिती
सध्या कोयना धरणाची पाणीपातळी २०९७ फूट ३ इंच (६३९.२४२ मीटर) वर पोहोचली आहे. धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा आता ४२.०१ टीएमसी झाला असून, धरण ३९.९१% भरले आहे. दरम्यान, पायथा वीजगृहातून सध्या कोयना नदीपात्रात कोणताही विसर्ग (०० क्युसेक्स) सुरू नसल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव; महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक २६६ मिमी गेल्या २४ तासांत धरण परिसरात आणि महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
ठिकाणआजचा पाऊस (मिमी)एकूण पाऊस (मिमी)
कोयना - १६५१४७९नवजा - १६०१७१४महाबळेश्वर - २६६२१९०पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचा ओघ असाच सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांत धरण पन्नास टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.