🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज : जयंत पाटील, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंची फडणवीसांसोबत बैठक

ब्रेकिंग न्यूज : जयंत पाटील, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंची फडणवीसांसोबत बैठक


मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याबाबत चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती. मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्थखात्याबाबत आपला दावा कायम राखला आहे. महायुतीत अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आले होते, त्यामुळे ते पुन्हा माघारी मिळावे अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले होते. याचपार्श्वभूमीवर आज सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचले.

 मात्र त्यानंतर 20 मिनिटांनी जयंत पाटील देखील वर्षा निवासस्थानी पोहचले. यानंतर जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होत असल्याचे समोर येत आहे. या भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट भाजपप्रणित एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चांना पुन्हा उत आला आहे. शरद पवार गट राज्यातील महायुतीत सहभागी होईल की केंद्रातील सत्तेत यावर अजूनही संभ्रम आहे. राज्यात काहीतरी महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असल्याच्या चर्चांना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही दुजोरा दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.