🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याबाबत भाजपची मोठी अट; 'हा' शब्द पाळला तरच एन्ट्री!

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याबाबत भाजपची मोठी अट; 'हा' शब्द पाळला तरच एन्ट्री!

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीमध्ये आणि राज्यात महायुती सरकारसोबत जाण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील 10 पैकी 9 आमदार तयार आहेत. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे बहुतेक आमदार आणि खासदार अतिशय आग्रही असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

शरद पवारांच्या आमदारांनी आपली आर्थिक अडचण होत असल्याचं अधोरेखित केलं. आमदारांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना, "तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हालाच वेगळा निर्णय घ्यावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये वाईट वाटून घेऊ नका," असा इशाराच दिला. भाजपसोबत जाण्याबाबत आमदारांची मते जाणून घेण्याची जबाबदारी पक्षाच्या ज्या नेत्यांवर सोपविण्यात आली आहे, त्यांनी रोहित पवार वगळता अन्य नऊ आमदारांची मते जाणून घेतली आहे. मात्र राष्ट्रवादीची तयारी असली तर केंद्रातील भाजपाच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर एक महत्त्वाची अट ठेवल्याची माहिती समोर येत आहे.

आमदारांची अडचण काय?

रोहित पवार वगळता बहुतेक सगळे आमदार भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचे बैठकीमध्ये समोर आले. सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांच्या पक्षाचे चार आमदार आहेत, त्या चौघांनीही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्हाला विकासकामांसाठी निधी मिळत नाही, असं स्पष्टपणे सांगितलं असून अशाप्रकारे निधी मिळाला नाही तर पुढची निवडणूक लढायची तरी कशी? असा सवाल केला. अजित पवार हे पूर्वीच आपलेच नेते होते, त्या हक्काने आम्ही त्यांच्याकडे निधी मागायला जायचो, मात्र त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून कदाचित पण त्यांनी आम्हाला निधीबाबत कधीही झुकते माप दिले नाही. आता सुनेत्रा पवार यांच्याकडे उद्या वित्त खाते गेलेही तरी त्या आम्हांला प्राधान्याने निधी देतील अशी शक्यता नाही. सत्तापक्षाचा भाग झाल्याशिवाय मतदारसंघांचा विकास करता येणार नाही, अशी भूमिका पक्षाच्या बहुतेक आमदारांनी मांडली आहे.

ती अट कोणती?

एकीकडे शरद पवारांचे आमदार सत्तेत सहभागी होण्यास उत्सुक असतानाच दुसरीकडे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पवारांच्या पक्षासमोर वेगळीच अट ठेवली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्याचप्रमाणे शरद पवार गटातील खासदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात जावे. या माध्यमातूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 'एनडीए'चे घटक व्हावे, अशी अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घातली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष विलिन झाले तरच पुढील मार्ग मोकळा असेल असं दिल्लीकडून स्पष्टपणे कळवण्यात आलं आहे.

जयंत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी अचानक 'वर्षा'वर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.