सांगली जिल्ह्यात आजपासून कडक प्रतिबंधात्मक आदेश; पाच किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्र जमण्यावर बंदी
या गोष्टींवर असेल पूर्णपणे बंदी:
जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कृत्ये करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे:शस्त्र बाळगणे: शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगणे.स्फोटक पदार्थ: कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेणे.दगडफेक व जमावबंदी: दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे फेकणे, गोळा करणे किंवा अशी उपकरणे तयार करणे. तसेच, सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असेल.आक्षेपार्ह प्रदर्शन: व्यक्तींच्या किंवा प्रेतांच्या आकृत्या, पुतळे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे. सभ्यतेला बाधा आणणारे हावभाव करणे, फलक, चित्रे किंवा चिन्हे तयार करून त्यांचे प्रदर्शन व प्रसार करणे.घोषणाबाजी व वाद्ये: शांतता भंग होईल अशा जाहीर घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्ये वाजविणे.
आदेशातून कोणाला सवलत?
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या आदेशातून काही अत्यावश्यक बाबींना वगळण्यात आले आहे:
कायदेशीर कर्तव्य बजावणारे शासकीय कर्मचारी.
धार्मिक विधी आणि अंत्यविधी.
नियोजित परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा केंद्र कर्मचारी.
अंमलबजावणीचा कालावधी:
हा आदेश १४ जुलै २०२६ रोजी रात्री ००.०१ वाजल्यापासून लागू होणार असून, तो २८ जुलै २०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत (१५ दिवस) संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.