"इराणचा थरकाप उडवणारा प्लॅन! १३ जागतिक नेत्यांना संपवणार? समोर आली मोस्ट वॉन्टेड नावे; पाहा कोणाचा आहे समावेश"
अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी मारले गेले. 28 फेब्रुवारी रोजी अली खामेनी यांचा खात्मा करण्यात आला. सर्वोच्च नेत्याला ठार केल्याने इराण सुडाने पेठून उठला आहे.
यामुळे अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. काही दिवसांपूर्वी, अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू या दोघांच्याही हत्येची मागणी करणारे नारे देण्यात आले होते. अशातच इराणने जगातील 13 शक्तिशाली नेत्यांची नाव आणि फोटोसहित हिट लिस्ट जारी केली आहे. या सर्व नेत्यांचा इराण खात्मा करणार आहे.
एका इराणी वृत्तपत्राने अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे सांगत, 13 शक्तिशाली जागतिक नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. हे वृत्तपत्र आपल्या प्रक्षोभक भाषेसाठी ओळखले जाते. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या आकस्मिक निधनानंतर दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्राने ही यादी प्रसिद्ध केली आहे. या हत्येमागे कट असल्याचा संशय अनेक अमेरिकन नागरिकांना आहे, मात्र अमेरिकन यंत्रणांनी कोणत्याही चौकशीची मागणी केलेली नाही.
इराणी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देशांतील नेत्यांचा समावेश आहे. यापूर्वी, अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीनंतर, इराणचे विद्यमान सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनीही एक लेखी निवेदन जारी केले होते. या निवेदनात ज्यात त्यांनी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांवर सूड घेण्याची शपथ घेतली होती. "सूड घेणे ही आमच्या राष्ट्राची इच्छा आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत घेतलाच पाहिजे. असं या संदेशात म्हंटले आहे.
इराणच्या हिट लिस्टवर असलेल्या नेत्यांची संपूर्ण यादी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ हे हिट लिस्टवर आहेत. यांच्यासह यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) चे कमांडर जनरल मायकल एरिक कुरिला, यूएस सेंट्रल कमांडचे उपकमांडर ब्रॅड कूपर आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ, परराष्ट्र मंत्री गिडियन सार, इस्रायली संरक्षण दलाचे चीफ ऑफ स्टाफ इमल झमीर आणि इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी यांच्यासह इस्रायली नेत्यांचाही या यादीत समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.