Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?

आरबीआयमध्ये लेखी परीक्षेशिवाय थेट भरती; ४ लाखांपर्यंत पगार असलेल्या या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा?


जर तुम्ही सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक. पूर्ण केले असेल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असेल, तसेच तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ‘कन्सल्टंट साईट इंजिनिअर’ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २० जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एकूण किती पदांसाठी भरती होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या भरती अंतर्गत एकूण ८ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही शाखांच्या इंजिनिअर्सच्या पदांचा समावेश आहे. ही नोकरी पूर्णवेळ कंत्राटी तत्त्वावर असेल. सुरुवातीला ही नियुक्ती ३ वर्षांसाठी असेल, जी गरज भासल्यास पुढे २ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

या भरतीसाठी कोण अर्ज करू शकते?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल विषयात बी.टेक. किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराकडे बांधकाम क्षेत्र आणि बिल्डिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंटशी संबंधित कामाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असावा. काही पदांसाठी सरकारी विभाग किंवा त्यांच्याशी संबंधित संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव देखील अनिवार्य करण्यात आला आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान ४० वर्षे आणि कमाल ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
पोस्टिंग कुठे होणार?

निवड झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती वेगवेगळ्या शहरांमध्ये केली जाईल. सिव्हिल इंजिनिअरच्या काही पदांसाठी रायपूर, चंदीगड, जम्मू, लखनऊ आणि मुंबई यांसारखी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी मुख्यत्वे मुंबईत पोस्टिंग दिली जाईल. अर्ज करताना उमेदवार आपल्या आवडीचा पर्याय देऊ शकतात.

पगार किती मिळणार?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल-२ पदासाठी दरमहा सुमारे २.४० लाख ते ३.४० लाख रुपयांपर्यंत आणि लेव्हल-३ पदासाठी सुमारे ३.१० लाख ते ४.१० लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय इतर सरकारी भत्तेही देय असतील.
निवड कशी होणार?

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. सर्वात आधी उमेदवारांचे अर्ज आणि त्यांच्या अनुभवाची तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. पुढे कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावरच अंतिम निवड केली जाईल.

अर्ज शुल्क किती असेल?
या भरतीसाठी फॉर्म भरताना सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूबीडी (PwBD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवार आरबीआयच्या rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.