🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत संतापजनक! सुनेची छेड काढणाऱ्या परप्रांतियाची मुजोरी; जाब विचारणाऱ्या सासऱ्यालाच संपवलं!

सांगलीत संतापजनक! सुनेची छेड काढणाऱ्या परप्रांतियाची मुजोरी; जाब विचारणाऱ्या सासऱ्यालाच संपवलं!


सांगली: सुनेची छेड काढल्याबद्दल जाब विचारणाऱ्या सासऱ्याचा परप्रांतीय शेतमजूराने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ह घटना वाळवा तालुक्यातील गोटखिंडी इथं घडली असून आरोपी राजू हा परप्रांतीय असून पांडुरंग गोविंद कोकाटे (वय ७३) असं मृत वृद्धाचे नाव आहे.

आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण करून पांडुरंग कोकाटे यांचा खून केला. संशयित राजूस याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही घटना बुधवार १५ जुलै रोजी सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास गोटखिंडी गावाशेजारी असलेल्या तोरणाई विहिरीजवळील ओढ्यालगतच्या गोठ्यात घडली. याबाबत मयत पांडुरंग कोकाटे यांच्या पत्नी मंगल पांडुरंग कोकाटे यांनी परप्रांतीय आरोपी राजू याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोठ्यात जनावरांना चारा टाकायला गेलेल्या महिलेची परप्रांतीय शेतमजूर असलेल्या राजू याने छेड काढली. त्यावेळी गोठ्याजवळ असलेले पीडित महिलेचे वृद्ध सासरे पांडुरंग कोकाटे यांनी याबाबत विचारणा करत आरोपी राजू याला जाब विचारला. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि संशयिताने लाकडी दांडक्याने वृद्धावर हल्ला केला. दरम्यान, सुनेने मदतीसाठी घराकडे धाव घेत आरडाओरडा करत ग्रामस्थांना बोलावले. ग्रामस्थ गोठ्यात आले असता वृद्ध पांडुरंग कोकाटे हे जखमी अवस्थेत पडले होते. आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पांडुरंग कोकाटे यांच्यावर हल्ला केल्यानंतर संशयित घटनास्थळवरून फरार झाला होता. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून डोंगर परिसरातील बिरोबा मंदिराजवळ त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या धक्कादायक घटनेनंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तसंच सांगली येथील फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पाहणी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.