Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वेची थेट 'सुहागरात कोच' सर्व्हिस? व्हिडिओ समोर येताच रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले; कडक कारवाई सुरू!

रेल्वेची थेट 'सुहागरात कोच' सर्व्हिस? व्हिडिओ समोर येताच रेल्वे प्रशासनाचे धाबे दणाणले; कडक कारवाई सुरू!


भारतीय रेल्वेच्या 1AC कोचला सुहागरात ( मधूचंद्राची रात्र ) प्रमाणे डेकोरेशन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात रेल्वेची कोणती अशी योजना आहे ज्यात ट्रेनमध्ये हनिमून साजरा करता येतो याची उत्सुकता प्रवाशांना लागली होती. 

त्यानंतर या प्रकरणात रेल्वेकडून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनच्या 1AC कोचला मधूचंद्राच्या रात्री प्रमाणे डेकोरेशन केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणात रेल्वेने आता कारवाई केली आहे. या प्रकरणात एका खाजगी सजावटकाराला परवानगीशिवाय रेल्वेच्या कोचमध्ये प्रवेश देऊन त्यास सजवू दिल्याप्रकरणात आता रेल्वेने तिकीट तपासनीसाला निलंबित केले आहे. रेल्वे प्रशासनाने ही एक गंभीर सुरक्षा त्रुटी मानली असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनच्या १ एसी डब्याच्या सजावटीचे प्रकरण व्हायरल होत आहे. हनीमून रूमप्रमाणे सजवलेल्या डब्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने आता संबंधित टीसीला ( तिकीट तपासनीस) निलंबित केले आहे. 

हा व्हिडीओ ६ जुलै २०२६ च्या ट्रेन क्रमांक ११००२ नंदीग्राम एक्सप्रेसचा आहे. या ट्रेनचा प्रवास करणाऱ्या एका कपलने त्यांच्या प्रवासाला खास क्षणांना साजरा करण्यासाठी हनीमून डेकोरेशन केले आहे. त्यांनी या आपल्या आरक्षित 1AC कोचच्या केबिनला सुहागरातचे डेकोरेशन करण्यासाठी ऑनलाईन एका खाजगी डेकोरेशन करणाऱ्याला हायर केले होते. या डेकोरेटरने ट्रेनच्या आत शिरुन संपूर्ण केबिनला सुहागरातच्या केबिन प्रमाणे सजवले. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासना तातडीने पावले उचलली आहे.
ट्रेस पासिंगची केस होऊ शकते ?

या प्रकरणात ट्रेनच्या संबंधित स्टाफला तत्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वेने दिले आहेत. जर एखादा प्रवासी संपूर्ण केबिन बुक करत असेल तर आणि त्याला आपल्या मनाप्रमाणे सजवत असेल तर रेल्वेला यावर कोणताही आक्षेप नाही. हा प्रवाशांचा अधिकार आहे कसा प्रवास करायचा आहे. मात्र, डब्यात एका त्रयस्त व्यक्तीला बेकायदेशीर अनधिकृतपणे प्रवेश देऊन अशा प्रकारे रेल्वेला धोक्यात खालले चुकीचे असल्याने या प्रकरणात टीटीईवर निलंबनाची कारवाई झाली आहे..



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.