नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) तंत्रज्ञ (Technician) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सिव्हिल/ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग अँड टेलिकॉम आणि रोलिंग स्टॉक या विभागांमध्ये एकूण 231 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असण्यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) किंवा डिप्लोमा (Diploma) असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
वेतन किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार दरमहा 35 हजार ते 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन किंवा विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.
अर्जाची अंतिम तारीख
अर्ज प्रक्रिया 7 जुलै पासून सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे. अर्ज शुल्काचा विचार केला तर, खुल्या प्रवर्गातील (UR), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी 400 रुपये शुल्क आकारले जाईल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले नाही.
'इथे' करा अर्ज
रेल्वे पीएसयू (Railway PSU) अंतर्गत काम करण्याची आणि बुलेट ट्रेन सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग होण्याची ही सुवर्णसंधी पात्र उमेदवारांकडे आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या nhsrcl.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.