सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मृतदेहावर अंत्यसंसकार सुरू असतानाच अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून अर्धवट जळालेला अवस्थेतील दहन झालेला मृतदेह पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याची घटना घडली.
या घटनेमुळे मृत्यूनंतरही मरणयातना संपत नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. पाटण तालुक्यातील ढोरोशी गावात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाटण तालुक्यातील ढोरोशी गावातील साहेबराव मुळीक यांच निधन झालं होतं. यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंसकार सुरू असतानाच अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील दहन झालेला मृतदेह पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याची घटना घडली.त्याचं झालं असं की ढोरोशी येथील साहेबराव मुळीक यांच्यावर दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येते होते. त्यानंतर ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला आणि अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासानंतर दहन केलेला मृतदेह पुराच्या पाण्यातून वाहून गेला होता. दरम्यान घटनेच्या वेळेस पाऊस जास्त असल्याने मृतदेह शोधण्यास प्रचंड अडचणी आल्या होत्या. अजूनही मृतदेह सापडला नाही आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर त्याचा शोध सूरू आहे. या घटनेनंतर नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.