दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिराला दान केलेले पैसे आणि वस्तूंच्या चोरीवरून भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राम मंदिराला भेट न देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केजरीवालांनी दावा केला की, शाह यांनी गेल्या अडीच वर्षांत अयोध्येतील राम मंदिराला एकदाही भेट दिलेली नाही. शाह यांच्यावर प्रभू रामाच्या नावाने मते मागण्याचा आरोप केला. यावेळी केजरीवालांनी 'आप'ला खरा सनातनी पक्ष असल्याचे म्हटले.
अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या अडीच वर्षांत राम मंदिराला भेट दिलेली नाही. या ८९१ दिवसांत त्यांनी भाषणे आणि मुलाखतींमध्ये ४२ पेक्षा अधिक वेळा राम मंदिराचा उल्लेख केला आहे आणि असंख्य मते मागितली आहेत. त्यांच्याकडे मतं मागायला वेळ आहे, पण आशीर्वाद घ्यायला वेळ नाही. ते म्हणाले, "मला अमित शाह यांना पाच प्रश्न विचारायचे आहेत."
केजरीवालांचे अमित शाह यांना पाच प्रश्न?
१. तुम्ही राम मंदिरात का अद्यापही का गेला नाहीत?२. तुम्हाला प्रभू रामाचे दर्शन घ्यावेसे वाटले नाही का?३. तुम्हाला राम मंदिरात जावेसे वाटले नाही का?४. तुम्हाला प्रभू रामाच्या आशीर्वादाची गरज आहे का?५. तुम्ही रामचंद्रजींना देव मानता का?
आम आदमी पक्षच हा देशाचा खरा सनातनी पक्ष असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. अरविंद केजरीवाल म्हणाले, "हे लोक रामचंद्रजींना देव मानत नाहीत. जर ते मानत असते, तर त्यांनी मंदीराची दान संपत्ती चोरली नसती. अनेक दशकांपासून त्यांनी प्रभू रामाच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी आणि सत्तेसाठी केला आहे. प्रभू रामचंद्रांनी २१ राज्यांमध्ये आणि केंद्रात त्यांची सरकारे स्थापन केली. यासाठी शाह हे आभार मानायला मंदीरात जाऊ शकले असते. पण ते गेले नाहीत. त्यांना देवाच्या आशीर्वादाची गरज नाही."
राम मंदीरातील दान संपत्तीच्या चोरीच्या बातमीने प्रत्येक सनातनी दुःखी झाला आहे. अमित शाह यांनी मते मागितली पण त्यांनी मंदीरात कधीही भेट दिली नाही, हे कळल्यावर लोकांना धक्का बसेल. ते केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी सनातनींचा वापर करत आहेत. देशात फक्त आम आदमी पार्टी हाच खरा सनातनी पक्ष आहे. केजरीवालांनी दावा केला की, आम आदमी पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने सनातनी मूल्यांवर काम करतो.
केजरीवाल म्हणाले की, सनातनांच्या सेवा आणि लोककल्याणाच्या भावनेनुसार पंजाबमध्ये शाळा आणि मोहल्ला क्लिनिक बांधले जात आहेत. आम आदमी पार्टी हा देशातील खरा सनातनी पक्ष आहे, जो समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी काम करत आहे. राम मंदीर दान संपत्तीच्या चोरीतील खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण दिले जात असल्याचा खळबळजनक आरोपही करत केजरीवाल यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.