कोर्टाचे आदेश धाब्यावर? अजामीनपात्र वॉरंट निघूनही मंत्री नितेश राणेंना अटक का नाही; पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह!
नितेश राणेंनी हा वॉरंट रद्द करण्यासाठी काही कायदेशीर पावले उचलले का? अटक केव्हा केली जाणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गोवा : भारतीय जनता पार्टीचे सतत वादात राहणारे नेते आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात काल न्यायालयाने अजामीनपात्र स्वरुपाचे वॉरंट जारी केले होते.
गोवा राज्याच्या म्हापसा न्यायालयाने ही कारवाई केली होती.
न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यामुळे मंत्री नितेश राणे यांना अटक केली जाईल का? असाही सवाल विचारण्यात येत होता. मात्र अद्यापही पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच मंत्री नितेश राणे यांच्याकडूनही या वॉरंटविरोधात काही पावलं उचलले गेले का? याचीही अद्याप काही माहिती समोर आली नाही.
नितेश राणेंना ज्या प्रकरणाच अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं, ते प्रकरण २०१३ मधील आहे. २०१३ मध्ये गोव्यातील धारगळ-पेडणे टोलनाक्याची तोडफोड आणि टोलनाका कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं हे प्रकरण होतं. हेच प्रकरण गोवा येथील म्हापसा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात दोन आरोपी आहेत.
अटक का नाही?
न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही मंत्री नितेश राणेंना अटक का करण्यात आली नाही? असा सवाल आता उपस्थित होत आहे. राणेंनी हा वॉरंट रद्द करण्यासाठी काही कायदेशीर पावले उचलले का? याचीही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांना अटक केव्हा केली जाणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नितेश राणेंना वॉरंट का बजावलं?
शनिवारी 4 जुलै रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सर्व आरोपी म्हापसा नायालयात हजर होते. मात्र मंत्री असलेले नितेश राणे सुनावणीस हजर राहिले नव्हते. राणे गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली दिसून येत होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.