Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"७ सप्टेंबरला 'उबाठा'ला खिंडार, १५ आमदार फुटणार!" – हिंदुस्थानी भाऊचा ठाकरेंना थेट 'अल्टीमेटम'; भांडुपच्या 'त्या' नेत्यावरही डागली तोफ

"७ सप्टेंबरला 'उबाठा'ला खिंडार, १५ आमदार फुटणार!" – हिंदुस्थानी भाऊचा ठाकरेंना थेट 'अल्टीमेटम'; भांडुपच्या 'त्या' नेत्यावरही डागली तोफ


मुंबई : 'आमच्या भोळ्याभाबड्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊ नका. तुम्ही आमचे धनुष्यबाण चोरले, पण हनुमानाच्या मशालीने जशी रावणाची लंका जाळली तीच मशाल आज आमच्या हाती असून या मशालीनेच आम्ही अन्यायाची लंका जाळणार', अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या रविवारी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर बिग बॉस फेम हिदुस्थानी भाऊ याने इन्स्टाग्रामवरुन उद्धव ठाकरेंना आपल्या नेत्यांना सांभाळण्याचा इशारा दिला आहे.

हिंदुस्थानी भाऊ काय म्हणतो?

"उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, माहिती आहे ना? मी मध्ये बोललेलो, की सांभाळा नाहीतर पंधरा आमदार आणि पंचवीस नगरसेवक जायच्या मागे आहेत. सचिन भाऊ अहिर पहिला बॉम्ब फुटला आणि सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबर सात तारीख, आठवण ठेवा ही दिनांक, खूप काही जाणार आहे" असं हिदुस्थानी भाऊ उद्धव ठाकरेंना म्हणाला.

संजय राऊतांना टोले
"तुमचा अनिल कपूर काय बोलतो? आता तुडवा ऑपरेशन चालू करणार. तुडवा ऑपरेशन चालू करणार? अरे, सचिन भाऊ अहिर कोण आहे? दगडी चाळचं नाव ऐकलं. ऐकलं ना? सात रस्ता, दगडी चाळ, अरूण भाई गवळी उर्फ डॅडी... बाळासाहेब काय बोलायचे माहिती आहे ना? तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे. हा तेच ते अरुण भाई गवळी. हा भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आत्ता तरी तोंड बंद करायला सांगा. नाही तर ह्याचा तुडवा ऑपरेशन चालू होईल हा. जय श्री राम. जय शंभू नारायण." अशा शब्दात हिंदुस्थानी भाऊ याने संजय राऊत यांना टोले लगावले.
ठाकरे गटाचे रामरक्षा आंदोलन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दान चोरीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'रामरक्षा आंदोलन' करण्यात आले. यावेळी दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती तसेच रामरक्षा स्ताेत्र आणि हनुमान चालिसा, मारुती स्ताेत्र पठणाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या आंदोलनाला उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अजय चौधरी, सुधीर साळवी, विशाखा राऊत आदी नेते उपस्थित होते.

'हिंदू आजही भरडला जात आहे'

'आपण कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आहोत, भाबडे आहोत पण मूर्ख नाही आहोत, आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर त्यांना अब हिंदू माफ नही करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, मंदिर वही बनायेंगे सांगितले गेले. तेव्हा शिवसैनिकांनी जेवढे काम केले तेवढे दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले नसेल. शिला पूजन, रथयात्रा आणि अयोध्येत जाऊन कार सेवाही आम्ही केली. मात्र हिंदू आजही भरडला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'मुंबईने जे भोगले ते क्वचितच एखाद्या शहराने भोगले असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा देशातील एकच मर्द शिवेसनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदूंच्या पाठीशी उभा राहिला होता. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, तेव्हा आधार शोधत होता, त्यावेळेला शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांच्या हातात दिला', असे ठाकरे म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.