सहकार क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी: खोडा घालणाऱ्यांना हायकोर्टाची चपराक, भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार!
सांगली :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे आणि विशेषतः सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC) नोकरभरतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय दिला आहे. सहकार विभागाने या भरती प्रक्रियेला दिलेली स्थगिती न्यायालयाने तात्काळ उठवली असून, भरती प्रक्रिया जशीच्या तशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा बँकेने सरकारच्या स्थगिती आदेशाविरोधात
न्यायालयीन लढाई लढली होती, ज्यामध्ये बँकेला मोठा विजय मिळाला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देव पाण्यात घालून बसलेल्या हजारो बेरोजगार उमेदवारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. "पारदर्शक भरतीला खोडा घालणाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' झाला!" या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मानसिंगराव नाईक यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते अत्यंत आक्रमकपणे म्हणाले: "आम्ही सुरुवातीपासूनच ही भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करत होतो. पण काही विघ्नसंतोषी लोकांनी आणि राजकीय स्वार्थापोटी या भरतीला खोडा घालण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या माध्यमातून स्थगिती आणून तरुणांच्या भविष्याशी खेळ मांडला गेला. पण न्यायदेवतेने आज दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे. पारदर्शक भरतीला खोडा घालू पाहणाऱ्यांचा खंडपिठाच्या या निर्णयाने 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे!"
न्यायालयाच्या आदेशात काय आहे?
स्थगिती तात्काळ रद्द: सहकार विभागाने भरती प्रक्रियेला लावलेले ब्रेक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत ती स्थगिती उठवली आहे.भरती सुरू ठेवण्याचे आदेश: जिल्हा बँकेला त्यांची नोकरभरती प्रक्रिया पूर्ववत आणि तातडीने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.शासनाला मुदत: या प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने राज्य शासनाला मुदत दिली असून पुढील सुनावणी निश्चित केली आहे. मात्र, तोपर्यंत भरती थांबणार नाही.
हजारो तरुणांच्या आशेला नवे धुमारे!
जिल्हा बँकेच्या या नोकरभरतीसाठी सांगली जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणींनी दिवस-रात्र एक करून अभ्यास केला होता. मात्र, राजकीय हेव्यादाव्यांमुळे लागलेल्या स्थगितीमुळे उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आणि नैराश्याचे वातावरण होते. आजच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता लवकरच ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन बँकेला नवे मनुष्यबळ आणि तरुणांना रोजगार मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.