Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या विकासाला मिळणार गती; जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती, नवीन GR प्रसिद्ध

सांगलीच्या विकासाला मिळणार गती; जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती, नवीन GR प्रसिद्ध


सांगली: महाराष्ट्र शासनाने सांगलीजिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण १५ जणांची नियुक्ती केली आहे. नियोजन विभागाने याबाबत ६ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला असून, जिल्ह्याच्या विकासआराखड्याला दिशा देण्यासाठी या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन, निधीचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, ग्रामीण व शहरी भागातील विकास आराखड्यांचा समन्वय साधणे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती आहे.

शासन निर्णयानुसार, दोन लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ११ विशेष निमंत्रित अशा एकूण १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांचा कार्यकाळ शासनाकडून नियुक्ती रद्द होईपर्यंत किंवा विद्यमान मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे.

जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त सदस्य

लोकप्रतिनिधींमधून नामनिर्देशित सदस्य

खासदार धैर्यशील संभाजीराव माने

आमदार गोपीचंद पडळकर

जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले सदस्य

संग्राम संपतराव देशमुख

दीपक आबासाहेब शिंदे

विशेष निमंत्रित :

सम्राट नानासाहेब महाडिक

भारती हेमंत दिघडे

पद्माकर धनवंत जगदाळे

निशिकांत प्रकाश भोसले

राजेंद्र (बापू) खरात

समीत चंद्रशेखर ऊर्फ बाळासाहेब कदम

अनिल गुणवंत पाटील

उदय ऊर्फ आनंदराव रामचंद्र पवार

तानाजी भगवान पाटील

ॲड. वैभव सदाशिवराव पाटील

जयश्री मदन पाटील



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.