🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

करिअर सुरू होण्याआधीच खाकी डागली! महिला IPS चे अश्लील चित्रीकरण करून भयंकर कृत्य; ट्रेनी IPS वर गंभीर आरोप

करिअर सुरू होण्याआधीच खाकी डागली! महिला IPS चे अश्लील चित्रीकरण करून भयंकर कृत्य; ट्रेनी IPS वर गंभीर आरोप


हैदराबादमधील शिवरामपल्ली येथील राष्ट्रीय पोलीस अकादमी (NPA) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका प्रशिक्षणार्थी IPS महिला अधिकाऱ्याने तिच्याच सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या उदय कृष्ण रेड्डी नावाच्या दुसऱ्या ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर लैंगिक छळ, मारहाण, ब्लॅकमेलिंग आणि डिजिटल छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी हैदराबादच्या अट्टापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून बदनामी

३० वर्षीय पीडित महिला आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी उदय कृष्ण रेड्डी हा २३ जूनपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. तो तिला व्हॉट्सॲपवर अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवायचा, तसेच इतर प्रशिक्षणार्थींसमोर तिच्याबद्दल अत्यंत अपमानजनक आणि बदनामीकारक विधाने करायचा. आरोपीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या आणि दुसऱ्या एका प्रशिक्षणार्थीसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करत, तो कबूल करण्यासाठी तिच्यावर सतत दबाव आणला.

खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करून पतीला पाठवला
तक्रारीतील माहितीनुसार, ८ जुलै रोजी आरोपी उदय कृष्ण रेड्डी याने पीडितेचा मोबाईल फोन जबरदस्तीने स्वतःच्या खोलीत नेला. तिथे त्याने पीडितेला धमकावून पासवर्ड विचारला आणि तिचे वैयक्तिक मेसेज तपासले. एवढेच नव्हे तर, आरोपीने पीडितेच्या संमतीशिवाय तिचा एक खासगी व्हिडीओ चोरून रेकॉर्ड केला आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि तिची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ तिच्या पतीला पाठवून दिला.
खोलीत डांबून गळा दाबला, मानेवर चाकू ठेवून जीवे मारण्याची धमकी

हा छळ इथेच थांबला नाही, तर ९ जुलैच्या रात्री आरोपीने पीडित महिला अधिकाऱ्याला वाटेत अडवले आणि जबरदस्तीने स्वतःच्या खोलीत ओढत नेलं. तिथे त्याने तिचे केस पकडले, तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि खोलीतून बाहेर पडू नये म्हणून तिच्या मानेवर चाकू ठेवला. या दरम्यान आरोपीने तिच्या प्रायव्हेट अंगाना स्पर्श करत अश्लील चाळे करत विनयभंग केला. त्यानंतर १० जुलै रोजीही आरोपीने तिला पुन्हा मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अट्टापुर पोलिसांनी आरोपी उदय कृष्ण रेड्डी याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ८२४/२०२६ नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत मारहाण, गुन्हेगारी धमकी, विनयभंग आणि महिलांवरील अत्याचाराच्या विविध गंभीर कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act), २००८ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.