🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"एखादा आंबा चोरला की फाशी नसते!" – NEEET आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा

​"एखादा आंबा चोरला की फाशी नसते!" – NEEET आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा


सांगली : एखादा आंबा चोरला की फाशी नसते. समज देणे असते. नीट पेपरफुटी प्रकरणी संशयितांना अटक केली आहे, कारवाई होणारच हे स्पष्ट असताना दिल्लीत होत असलेले आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर माध्यम प्रतिनिधींनी बोलताना ते म्हणाले, नीट पेपर फुटी नंतर फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यांचे निकाल जाहीर झाले. पुढील प्रक्रिया सुरू आहे. तरीही याच विषयावरुन आंदोलन केले होत आहे. यामागे राजकारण आहे. संसदेचे अधिवेशन विस्कळीत व्हावे, महत्वाची विधेयके मांडली जाऊ नयेत असा हेतू यामागे आहे. समोर येत असणाऱ्या ध्वनी चित्रफिती वरुन हे दिसत आहे. विरोधकांनी यांचे राजकारण करु नये. उठसूट राजकारण केल्याने देशाचे नुकसान होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बिघडते.

पेपर फुटी होऊ नये यासाठी सरकारने नक्कीच उपाययोजना केल्या पहिजेत, मात्र हा एकच विषय घेऊन दिल्लीत सुरु असणारे आंदोलन हे कोणत्या हेतूने सुरु आहॆ. यामागे कोण आहॆ. हे सर्व देशाला माहिती आहे. पेपरफुटीचे राजकारण करण्यामागे या लोकांचा हेतू काय आहॆ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह संसदेत बोलायला उभारले की पोलखोल करतील असेही मंत्री पाटील म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात २०१९ आणि २१ मधील महापूराचा अनुभव पाहता सरकारने योग्य उपाययोजना केल्या आहेत. पाऊस पुन्हा सुरु झाला आहे, त्यामुळे यंदा पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही राज्यामध्ये समन्वय राखला जात आहे अशी माहितीही पालकमंत्री पाटील यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.